घरठाणेआव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, सहायक आयुक्तांना कार्यकर्त्यांकडून मारहाण

आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी, सहायक आयुक्तांना कार्यकर्त्यांकडून मारहाण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सहायक आयुक्त महेश अहिरे यांना त्यांच्या अंगरक्षकसोबत असताना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट ४च्या बाहेर बेदम मारहाण केली. हा प्रकार आज सायंकाळी घडला असून याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आहेर हे अंदाजे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महापालिका मुख्यल्यातून बाहेर पडले. त्यावेळी, राष्ट्रवादी कार्यकर्ते तिथे आले. यावेळी त्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या कुटुंबीयांना संपवतो का? असा सवाल करत आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत आहेर यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, आहेर यांना पोलीस संरक्षण आहे. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा त्यांचे अंगरक्षक त्यांच्यासोबत होते.

- Advertisement -

एका अंगरक्षकाने त्याच्याजवळची रिव्हॉल्व्हर काढून मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर रोखत आहेर यांना महापालिका मुख्यालयात आणले. त्यानंतर मुख्यालयात नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी धाव घेतली. पोलीस बंदोबस्तात महेश आहेर यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण वायरल झाले आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केली आहे.

- Advertisement -

या संभाषणात, माझं जेव्हा प्रोटेक्शन काढलं. तेव्हा रात्री पावणे बारा वाजता सीएमनी जॉइन्ट सीपीना फोन केला होता. माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका आहे, असं मी क्रिएट करून ठेवलंय. पोलीस अधिकाऱ्यांना पटवून ठेवलं आहे . आव्हाड माझं केव्हाही काही करू शकतो…अस मी क्रिएट करून ठेवलं आहे. बाबाजीला सांगून आमचे शूटर स्पेनमध्ये कामाला लावले आहेत. नातशाचा पत्ता शोधला आहे. त्याचा जावई ठाण्यात नाही आला. तर त्याच्या बापावर एक अटॅक केला ना, तर तो एका दिवसात येईल. मी एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावली. तो असा नाही आला ना त्याच्या एरियाचा पत्ता शोधून ठेवला आहे. स्पेन एवढं मोठं नाही. त्याचा विकास कॉम्प्लेक्स पत्ता आहे, त्याच्या आई वडिलांच्यासोबत एक कांड केला. तर तो आई बाबांच्या ओढीने लगेच येईल. मी एअरपोर्टपासून फिल्डिंग लावली. त्याची गेम करणार त्याच्या मुलीला रडायला लावणार , म्हणजे त्याला कळणार मुलीचं दुःख काय असतं?प्लानिंग केलं आहे. तो साप आहे म…

मी सर्व प्लान केला आहे. त्याला देखील कळले पाहिजे महेश कधीही स्पॉट होऊ शकतो. आपली फॅमिली उध्वस्त होऊ शकते. मुलीला काहीही होऊ शकते, तेव्हा तो आटोक्यात येऊ शकतो तेव्हा तो शांत होईल. मला ठेचायचा आहे त्याला ! माझा माणसाला विचारा सुटकेस भरून बाबाजीकडून पैसे येतात. बाबाजी माझ्यासाठी लीगल प्रोपार्टी साठी काम करतो,” असे महेश आहेर याने या संभाषणात म्हटले आहे. दरम्यान, अशा धमक्यांना आपण घाबरत नसून पोलीस तक्रारही करणार नाही. कारण, पोलीस काय करणार नाहीत, हे आपणांस माहित आहे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -