घररायगडनियम धाब्यावर बसवून विद्यार्थी वाहतूक सुरूच; महाड परिवहन निरीक्षकांनी लक्ष देण्याची गरज

नियम धाब्यावर बसवून विद्यार्थी वाहतूक सुरूच; महाड परिवहन निरीक्षकांनी लक्ष देण्याची गरज

Subscribe

स्कूल बसला विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक करणार्‍या वाहनांना कडक नियमावली घालून देण्यात आली. मात्र ही नियमावली कागदावरच अधिक प्रभावीपणे दिसून येत असून नियम धाब्यावर बसवून आजही खुलेआम विद्यार्थांची वाहतुक सुरूच आहे. याला प्रशासनाबरोबर मुलांचे पालकही तितकेच जबाबदार आहेत. महाराष्ट्र परीवहन विभाग कार्यालयाकडून नेमण्यात आलेले निरीक्षकांचे देखील याकडे दुर्लक्ष असल्याने या वाहतुकीत वाढ होत असल्याची चर्चा असून या खात्याने या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

निलेश पवार: महाड
स्कूल बसला विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतूक करणार्‍या वाहनांना कडक नियमावली घालून देण्यात आली. मात्र ही नियमावली कागदावरच अधिक प्रभावीपणे दिसून येत असून नियम धाब्यावर बसवून आजही खुलेआम विद्यार्थांची वाहतुक सुरूच आहे. याला प्रशासनाबरोबर मुलांचे पालकही तितकेच जबाबदार आहेत. महाराष्ट्र परीवहन विभाग कार्यालयाकडून नेमण्यात आलेले निरीक्षकांचे देखील याकडे दुर्लक्ष असल्याने या वाहतुकीत वाढ होत असल्याची चर्चा असून या खात्याने या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यात सर्वत्र स्कूलबस नियमावली बनवण्यात आली असली तरी मुलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन आणि पालक देखील गांभीर्‍याने घेत नसल्याचे दिसून येते. अनेक सुशीक्षीत पालक देखील आपल्या कोवळया जिवांना कोंबूनच रिक्षा अगर मॅक्झीमो सारख्या छोटया गाडयांमधूनच प्रवास करावयास लावत असल्याचे चित्र रोज पहाटे पहावयास मिळत आहे. पहाटे उठून शाळेचा रस्ता धरणार्‍या छोटया छोट्या विद्यार्थ्यांना अनेक भंगार स्कूल बसमधूनच प्रवास करावा लागत आहे. आधीच खराब असलेल्या या रस्त्यांवर भल्या भल्यांचे कंबरडे मोडते तिथे छोटया मुलांचे काय असा प्रश्न पडणे स्वाभावीकच आहे. तरी देखील पालक आपल्या मुलांना अशा गाड्यांमधून प्रवास करावयास भाग पडतात हे वास्तव आहे.
महाडसारख्या ठिकाणी देखील स्कूलबसना अपघात झाल्याच्या किरकोळ घटना घडून देखील याकडे गांभीर्याने घेतलेले नाही. महाड शहरात बहुतांश शाळांमध्ये स्कूल बसेस सेवा लागू आहे. अनेक शाळांमध्ये पिवळया रंगाच्या खाजगी बसेस आहेत मात्र या बसेस म्हणजे जुन्याच गाडयांना नवीन मेकअप केल्याचा प्रकार आहे. तर अनेक शाळांमध्ये मॅक्झीमो, टाटा मिनीबस, जिप अशा वाहनांना काचेवर स्कूलबसचा स्टीकर लावून व्यवसाय केला जात आहे. या गाडयांमधून मेंढर कोंबून नेल्याप्रमाणे मुलांना भरले जाते आणि वाहतूक केली जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहेच परंतू पालक देखील याकडे कानाडोळा करून आहेत. शाळा देखील आता पालकांची जबाबदारी लिहून घेत आपले हात वर करत आहेत.

- Advertisement -

पालकांची उदासिनता
आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी शाळा वापरत असलेली बस योग्य आहे का याची साधी विचारणा देखील केली जात नाही. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच अनेक शाळा बसची फी वसूल करतात. अनेक पालक रिक्षा, छोट्या बस, अशा विविध मार्गाने आपल्या पाल्याला शाळेत पाठवतात. याकरीता चांगले पैसेही मोजतात मात्र मुलांना कशा प्रकारे गाडयांतून कोंबले जाते याबाबत साधा जाब देखील पालक विचारताना दिसून येत नाही. यावरून पालक आपल्या पाल्याबाबत किती जागरूक आहेत हे दिसून येते. एखादा अपघात झाल्यानंतर मात्र हेच पालक प्रशासनावर आगपाखड करताना दिसतात.

 निरीक्षक नेमले पण ते आहेत कुठे?
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने स्कूलबसच्या चौकशींकरीता निरीक्षक नेमले खरे पण कमी स्टाफ आणि संपूर्ण जिल्हा अशा स्थीतीत एक निरीक्षक कुठे कुठे पाहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या आरटीओ शिबीरांमधून येणारे निरीक्षकांनी तरी या वाहनांची तपासणी अगर त्यामधून भरलेली मुले पाहील्यानंतर कारवाई करणे अपेक्षीत आहे. मात्र ज्या दिवशी परिवहन विभागाचे शिबीर असते त्यावेळी मात्र अवैध वाहतूक बंद ठेवली जाते.

- Advertisement -

परिवहन समित्या काय करतात?
स्कूल बसच्या मनमानीला चाप लावता यावा याकरीता राज्य परिवहन विभागाने शाळांमधून परिवहन समित्या स्थापन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे शाळांनी प्रशासकीय प्राटोकॉल संभाळण्याकरीता परिवहन समित्यां स्थापन केल्या मात्र या समित्यांच्या डोळयादेखत स्कुलबसमधून मेंढराप्रमाणे भरून जाणारी मुले दिसत असताना या परिवहन समित्या काय करतात असा प्रश्न निर्माण होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -