घररायगडमहाडमध्ये मनु स्मृती दहन दिन साजरा

महाडमध्ये मनु स्मृती दहन दिन साजरा

Subscribe

महाड-: येथील क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनु स्मृती ग्रंथाची होळी केली होती. या घटनेचा ९६ वा स्मृतीदिन  साजरा झाला. बौद्धजन पंचायत समिती आणि विकास वंचित महिला मंडळाच्या वतीने क्रांती स्तंभाजवळ सभा घेण्यात आल्या. ( Manu Memorial Day organized by Buddhjan Panchayat Samiti and Vikas Vanchit Mahila Mandal) यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना देशात पुन्हा मनुवादी सरकार देण्याचे आश्वासन देऊन भावी पिढीला गुलाम करीत असून यापासून वाचवायचे असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून सन्मानाने जगायला शिकले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ साली मनुरचित मनु स्मृती हा ग्रंथ जाळून टाकला. या ग्रंथाने समाजाच्या तळागाळातील जनतेला विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते. शिवाय महिलांवर अन्याय होईल अशा प्रकारे बंधने घालण्यात आली होती. या मनु स्मृती दहनानाचा ९६ वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. वंचित विकास महिला मंडळाच्या डॉ.प्रमिला संपत गेल्या २० वर्षांपासून हा दिवस महिला मुक्ती दिन म्हणून देखील साजरा करीत आहेत. यामुळे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपत यांच्या नेतृत्त्वाखाली महिलांनी शहरातून घोषणा देत क्रांतीस्तंभ गाठले.

- Advertisement -

नागरिकांनी जागरूक झाले पाहिजे-आनंदराज आंबेडकर                                                                 बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी आपले विचार मांडताना  डॉ. बाबासाहेबांनी समाजामध्ये वावरताना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली, मात्र स्वाभिमान गहाण ठेवून अनेकजण आपला स्वार्थ साधत आहेत, अशा शब्दात नाव न घेता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका केली. देशात असलेल्या सरकारमुळे संविधान धोक्यात आले असून, बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. यामुळे नागरिकांनी जागरूक झाले पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून समाजाला यातून वाचवले पाहिजे, असे आवाहन देखील केले. यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली. मनु स्मृती दहन दिन आणि चवदार तळे सत्याग्रह स्मृती दिन या दोन्ही कार्यक्रमांना स्थानिक भूमिपुत्रांची उपस्थिती कमी असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आम्ही विचाराने मोठे झालो नाही-प्रा.संपत
आपल्या भाषणात प्रा. संपत यांनी देखील स्थानिकांच्या अल्प उपस्थितीवर नाराजी व्यक्त करीत विदर्भात ही भूमी असती तर आगळावेगळा कार्यक्रम झाला असता, असे सांगितले. बाबासाहेबांचा विचार हा बॅनरबाजीतून नव्हे तर कृती आणि वागणुकीतून व्यक्त झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जगात जेथे झाल तेथे बाबासाहेब दिसतील; त्यामुळे ते केवळ भारतरत्न नाहीत तर ते विश्वरत्न आहेत. बाबासाहेब डोक्यात घेतला पाहिजे. आम्ही मात्र मनोरंजन आणि भौतिक सुखात गुंतलो गेलो आहोत, आम्ही विचाराने मोठे झालो नाही अशी खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -