घररायगडमुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूरनजिक हॉस्पिटलची गरज

मुंबई – गोवा महामार्गावर पोलादपूरनजिक हॉस्पिटलची गरज

Subscribe

शासनाकडून देण्यात आलेल्या डिसेंबरच्या डेडलाईनमुळे मुंबई - गोवा महामार्ग अखेर सुरू होणार आहे. कोकणातील या जलदगती मार्गावर वाहने सुसाट वेगाने धावणार असल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने रुग्णांवर तातडीने योग्य उपचार होण्यासाठी अद्यावत हॉस्पिटलची गरज निर्माण झाली आहे. बोगद्यांच्या परिसरात महामार्गावर आणि प्रामुख्याने आर्थोपीडीक तसेच नुरोलॉजी या दोन विभाग असलेेल सुसज्ज हॉस्पीटल असावे अशी महाड पोलादपूर तालुक्यातील जनतेची इच्छा असून केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालयाने याकामी पुढाकार घ्यावा, असे त्यांचे मत आहे.

बबन शेलार: पोलादपूर
शासनाकडून देण्यात आलेल्या डिसेंबरच्या डेडलाईनमुळे मुंबई – गोवा महामार्ग अखेर सुरू होणार आहे. कोकणातील या जलदगती मार्गावर वाहने सुसाट वेगाने धावणार असल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने रुग्णांवर तातडीने योग्य उपचार होण्यासाठी अद्यावत हॉस्पिटलची गरज निर्माण झाली आहे. बोगद्यांच्या परिसरात महामार्गावर आणि प्रामुख्याने आर्थोपीडीक तसेच नुरोलॉजी या दोन विभाग असलेेल सुसज्ज हॉस्पीटल असावे अशी महाड पोलादपूर तालुक्यातील जनतेची इच्छा असून केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालयाने याकामी पुढाकार घ्यावा, असे त्यांचे मत आहे.
सातत्याने मुंबई – गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी आणि अपघातांच्या घडणार्‍या घटनांमुळे प्रवासी तसेच अवजड मालवाहतूक करणार्‍या वाहन चालक, त्यांचे मदतनीसांचा जलद आणी निर्धोक प्रवास होण्याकरीता केंद्रिय रस्ते वाहतुक मंत्रालयाने मुंबई -गोवा महामार्ग रस्ता प्रकल्प राबविला. हा महामार्ग डिसेंबरच्या अखेर वाहतुकीसाठी खुला होईल अशी ग्वाहीही महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या वाहतुक मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जसे पुणे द्रूतगती मार्गावर जलदगतीने वाहने ये-जो करतेवेळी अपघाताच्या घटना घडत आहेत, त्याप्रमाणेच या महामार्गावरही दुर्घटना घडली की अपघातग्रस्तांना पोलादपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत असते. अपघातप्रसंगी संबंधीत व्यक्तिच्या डोक्यास गंभीर इजा तसेच हातपाय फॅक्चर होणे किंवा मोडणे, तुटणे अशा इजा होत असतात. अशावेळी येथील ग्रामीण रुग्णालयात या दुखापतींवरील तज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी नसल्याने केवळ
प्रथमोचार करण्यात येत असून जखमींना पुणे, पनवेल, मुंबई येथे उपचारार्थ हलविले जाते. अशावेळी काही जण वाचतात तर काहींचा रुग्णालयात जाईपर्यंत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे.

काहींना जीव गमवावा लागला
मुंबई -गोवा महामार्गावर महाड, पोलादपूर तालुक्यात शासकीय ग्रामीण हॉस्पिटल आणि महा ड तालुक्यात ट्रामा केअर हॉस्पीटल अशी दोन शासकिय रूग्णालये असली तरी या रुग्णालयांमध्ये आर्थोपेडीक आणि न्युरो लॉजिस्ट तज्ञ
नसल्याने अपघातग्रस्तांना दीडशे, दोनशे किलो मीटर अंतरावरील रुग्णालयात नेतेवेळी तसेच तेथे दाखल केल्यावर वैद्यकिय उपचाराला विलंब झाल्यामुळे काहींना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत.

- Advertisement -

अपघातग्रस्तांवर त्वरीत उपचार व्हावेत
महाड, पोलादपूर आणि खेड तालुक्यातील महामार्गावर नियमितपणे ये -जा करणार्‍या वाहन चालकांशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, काही अपवादात्मक अपघातांच्या घटना वगळता कोणीही वाहनचालक स्वत:हून अपघात करत नाही, प्रत्येक वाहनचालक मृत्यूला कवटाळ्ण्यासाठी वाहन चालवित नाही. त्यामुळे अपघाताची घटना घडल्यास कशेडी घाट परिसरात आथोर्र्पेडिक आणि न्युरोलॉजीस्ट तज्ञ तसेच स्टाफसह दोन विभाग असलेल्या अद्ययावत हॉस्पिटलची गरज असून त्यामुळे भविष्यात अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार होतील.

सध्याची वैद्यकीय सेवा रामभरोसे
राज्य आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद यांच्यावतीने हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे चालविली जात असली तरी सफाई कामगारांपासून परिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि वैद्यकिय अधिका री यांची अनेक पदे रिक्त आहेत. तसेच मूळातच या दोन्ही यंत्रणांची वैद्यकीय सेवा रामभरोसे झाली झाल्याने केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि हॉस्पिटल बांधले जावे, या मागणीची दखल घ्यावी असे प्रवाशी संघटना आणि वाहन चालक संघटनेचे म्हणणे आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -