घरट्रेंडिंगखिशात ठेवता येणारे मिनी फॅन, कूलर बाजारात दाखल

खिशात ठेवता येणारे मिनी फॅन, कूलर बाजारात दाखल

Subscribe

शॉपिंग साईट्सवर आउट ऑफ स्टॉक

 नाशिक : उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत. घर, ऑफिसेसमध्ये लोकांनी एसी आणि कूलरच्या गार हवेला पसंती दिली आहे. उन्हापासून वाचण्यासाठी घरात बसता येत नाही. कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त बाहेर जावे लागते. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी काही उपकरणे यंदा बाजारात दाखल झाली आहेत. मिनी फॅन आणि कूलरने यंदा बाजारात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांनी या उपकरणांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने अ‍ॅमेझॉन फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर हे आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत.

मोठे फॅन आणि एसी सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडत नाही, परंतु तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे हल्ली सर्वच गोष्टींना पर्याय उपलब्ध झाला आहे. उन्हाळ्यात फॅन, एसीची जागा पोर्टेबल फॅन आणि कूलरने घेतली आहे. हे फॅन ३०० रुपायांपासून २ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. वजनाने हलके असल्याने त्याला खिशात घालूनही नेता येते. त्याशिवाय हे फॅन चार्जिंग आणि सेलवर देखील चालू शकतात. मिनी कूलरच्या ट्रेमध्ये आईस क्यूब टाकले तर एसीसारखी गार हवा यातून मिळते. पोर्टेबल फॅन आणि कूलरला नागरिक प्रवासादरम्यान वापरायला पसंती देत आहेत. विशेष म्हणजे आपण मोबाईल व संगणकाला यूएसबीने हे फॅन जोडून गारव्याचा अनुभव घेवू शकतो. सामान्य फॅनला वेग नियंत्रण करण्यासाठी जसे अनेक पर्याय असतात तसेच, या मिनी फॅनलाही वेगनियंत्रणाचे तीन पर्याय असतात. विविध रंगछटा असलेले हे मिनी फॅन कूल लुकमध्ये उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उपकरणांना मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवल्याने ऑनलाईन देखील याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

- Advertisement -

किंमतीदेखील पॉकेट फ्रेंडली

टेबल फॅन किंवा सिलींग फॅन घ्यायला आपण बाजारात गेलो तर साधारण २ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागते, परंतु हे छोटे फॅन आणि कूलर ३०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. अगदी ब्रँडेड कंपनीच्या मिनी फॅन कूलरची खरेदी केली तरी ते १ हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत उपलब्ध असल्यामुळे ते सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडणारे आहेत.

ही आहेत वैशिष्ट्ये :

  • हे फॅन ३०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
  • हे वजनाने हलके असल्याने आपण प्रवासातही त्यांचा वापर करू शकतो.
  • लाईट नसतांनाही सेलच्या मदतीने आपण त्याचा वापर करू शकतो.
  • छोट्या कूलरमध्ये आईसक्यूब टाकून आपण एसीसारखा आनंद घेवू शकतो.
  • आपल्या संगणक आणि मोबाईलला जोडून आपण गारव्याचा आनंद घेवू शकतो.

कूल कॅपलाही विशेष पसंती

आपल्याला सर्वसाधारण कॅप माहिती आहे. परंतु या उन्हाळ्यात छोटासा फॅन आणि सोलर प्लेट अटॅच असलेली कॅप बाजारात दिसून येत आहे. विशेष म्हणजे तुम्ही जेवढे उन्हात फिराल तेवढ्याच वेगाने या कॅपमध्ये असणारा फॅन फिरेल आणि तुम्हाला गारवा मिळेल. सध्या शॉपिंग साईट्सवर ३०० रुपयांपासून ते १ हजार रुपायांपर्यंत या कॅप उपलब्ध आहेत.

- Advertisement -

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -