घररायगडमुरुडमधील लहानग्यांचा प्रमाणिकपणा; पैशासह महत्वाची कागदपत्रे असलेले पॉकेट केले परत

मुरुडमधील लहानग्यांचा प्रमाणिकपणा; पैशासह महत्वाची कागदपत्रे असलेले पॉकेट केले परत

Subscribe

शहरातील मसाल गल्लीतील चार मुलांना पैशांनी भरलेले पॉकीट रस्त्यावर सापडले.सापडलेला पॉकीट मुलांनी ताबडतोब मुरूड पोलीस ठाण्यात जाऊन तेथे जमा केले.पोलिसांकडून त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. मसाल गल्लीतील आरुष मनोज मसाल (१३), निल महेश मसाल(११),आर्यन किशोर मसाल (११),आरव किशोर मसाल (९) हे चौघे जण देवाच्या दर्शनासाठी क्षेत्रपाल या ठिकाणी गेले असता दर्शन घेऊन येत असताना दत्तमंदिर लगतच्या रस्त्यावर पॉकेट पडलेल्या अवस्थेत दिसून आले, ते उघडल्यावर पैसे दिसून आले. त्यावेळी घरी न जाता या मुलांनी थेट मुरुड पोलिस ठाण्यात जाऊन सापडलेले पॉकेट जमा केले.

मुरुड: शहरातील मसाल गल्लीतील चार मुलांना पैशांनी भरलेले पॉकीट रस्त्यावर सापडले.सापडलेला पॉकीट मुलांनी ताबडतोब मुरूड पोलीस ठाण्यात जाऊन तेथे जमा केले.पोलिसांकडून त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. मसाल गल्लीतील आरुष मनोज मसाल (१३), निल महेश मसाल(११),आर्यन किशोर मसाल (११),आरव किशोर मसाल (९) हे चौघे जण देवाच्या दर्शनासाठी क्षेत्रपाल या ठिकाणी गेले असता दर्शन घेऊन येत असताना दत्तमंदिर लगतच्या रस्त्यावर पॉकेट पडलेल्या अवस्थेत दिसून आले, ते उघडल्यावर पैसे दिसून आले. त्यावेळी घरी न जाता या मुलांनी थेट मुरुड पोलिस ठाण्यात जाऊन सापडलेले पॉकेट जमा केले. भरलेले पॉकेट पोलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये ६हजार २१० रुपये आणि महत्वाची कागदपत्रे होती.पॉकेटमधील कागदपत्रांच्या आधारे मूळ मालक शहरातील मारुती नाका जवळील रहिवासी असणारे मिलिंद (मोना) कवळे यांना संपर्क साधुन पैशांनी भरलेले पॉकेट आणि महत्वाची कागदपत्रे परत केले.
दरम्यान, या चौघा मुलांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक मसाल गल्ली तरुण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कार्यकारी अध्यक्ष उल्हास गुंजाळ, पाखाडी अध्यक्ष मधुकर मसाल, उपाध्यक्ष दिलीप विरकुड,देवेंद्र मसाल, केतन वर्तक, महिला मंडळ अध्यक्ष शितल विरकुड ,सिद्धेश भायदे, गणेश वर्तक, प्रसाद गवंडी, संदीप पाटील, कल्पना पाटील, संजय गुंजाळ, सायली गुंजाळ, डॉ. अमित बेनकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुलांना वह्या पेन,कंपास बॉक्स आदिंसह भेट वस्तू देऊन गौरविण्यात आलं.

मुलांवर आई- वडीलांचे चांगले संस्कार
यावेळी मिलिंद (मोना)कवळे यांनी सांगितले की ,गाडीवरून क्षेत्रापाल जात असताना पॉकेट पँटच्या मागील खिशातून पडल्याचे समजले नाही. नशीब माझं या चौघांना माझं पॉकेट मिळाले, या मुलांवर यांच्या आई- वडीलांचे चांगले संस्कार असल्याने हे पॉकेट मला मिळाला.या पॉकीटात रोख रक्कम आणि पॅन कार्ड, आधार कार्ड आणि हेवी लायन्स होते. ते मिळाले नसते तर पुन्हा नव्याने कागदपत्रे बनावण्यासाठी काही दिवस लागले असते आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असता.चांगली मुले या जगात आहेत म्हणून माणुसकी टिकली आहे. यावेळी त्यांनी पोलिसांचेही आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -