घररायगडनववर्ष स्वागतासाठी दीड लाख मद्यपि ‘परमिट’धारी; ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीने परवाने

नववर्ष स्वागतासाठी दीड लाख मद्यपि ‘परमिट’धारी; ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीने परवाने

Subscribe

नववर्ष स्वागतासाठी सज्ज झालेल्या रायगडकरांपैकी तब्बल दीड लाख जणांनी दारू पिण्यासाठी ‘परमिट’ काढले आहे. या मध्ये देशी आणि विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या परमिटचा समावेश असून, दोन रुपये आणि पाच रुपये दराने उपलब्ध असणार्‍या या परमिट विक्रीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.यंदाचे नववर्ष हे जल्लोषात साजरे केले जाणार आहे

दीपक घरत: पनवेल
नववर्ष स्वागतासाठी सज्ज झालेल्या रायगडकरांपैकी तब्बल दीड लाख जणांनी दारू पिण्यासाठी ‘परमिट’ काढले आहे. या मध्ये देशी आणि विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या परमिटचा समावेश असून, दोन रुपये आणि पाच रुपये दराने उपलब्ध असणार्‍या या परमिट विक्रीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.यंदाचे नववर्ष हे जल्लोषात साजरे केले जाणार आहे. नववर्षात मद्यविक्रीही मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच दारु पिणार्‍यांचे प्रमाणही जास्त असते. अशा मद्यपिंना दारू पिण्यासाठी परवाना गरजेचा असतो. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४९ हजार नागरिकांनी दारू पिण्याचे परमीट घेतले असून नव्या वर्षाचे स्वागत फुल्ल टल्ली होऊन केले जाणार असल्याचे या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे. थर्टी फर्स्टला आणखी काही तास उरले असल्याने अशा ‘परमिट’धारी मद्यपींमध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहेच.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार रायगड जिल्ह्यात विदेशी मद्य पिण्यासाठी १ लाख नागरिकांनी ऑफलाईन पद्धतीने एका दिवसाचे परवाने काढले आहेत तर ४९ हजार नागरिकांनी देशी मद्य पिण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने परवाने काढले आहेत. या संख्येत ऑनलाईन पद्धतीने परवाने काढणार्‍यांची संख्या समाविष्ठ नाही. देशी साठी २ रुपये आणि विदेशी साठी ५ रुपये दराने एका दिवसा साठी परवाने उपलब्ध. तर वर्षभराच्या परवान्यासाठी १०० रुपये तर कायमस्वरूपी साठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येते.

हजारो लिटर मद्य विक्री
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्य रातून पर्यटक रायगड जिल्ह्यातील अलिबाग तसेच इतर पर्यटन स्थळ असलेल्या ठिकाणी येत असतात. नवंवर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर पूर्वीच पर्यटक पर्यटन स्थळी दाखल होत असल्याने आता पासूनच जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पर्यटकांनी हाऊसफूल झाली आहेत. नववर्षाचे स्वागत करताना अनेक जण मद्यपान करण्यास पसंती देत असल्याने एका दिवसात देशी- विदेशी प्रकारच्या हजारो लिटर मद्याची विक्री होत असते.

- Advertisement -

बॉक्स..
पोलिसांची करडी नजर
या काळात गैर प्रकार होऊ नये या करता नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांवर आणि मद्य विक्री केंद्रावर पोलिसांची करडी नजर असते.विना परवाना दारू पिणार्‍यांवर पोलीस कारवाई करत असल्याने पोलिसांच्या कारवाई पासून वाचण्यासाठी अनेकजण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे एक दिवसीय परमिट खरेदी करातात राज्य उत्पादन शुल्क विभाग या साठी विदेशी साठी पाच आणि देशीसाठी २ रुपये दर आकारते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -