घरताज्या घडामोडीकाँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

काँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Subscribe

काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस भवनाला भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काही लोक काँग्रेसमुक्त भारत करायचं म्हणतात. पण काँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही, असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावं लागणार आहे. सत्ताधारी पक्ष हा देशामध्ये विद्वेष निर्माण करत आहे. आताचं सरकार काँग्रेसविरोधी विद्वेशाची भावना कशी निर्माण होईल, यातच धन्यता मानत आहे. पण काँग्रेसी विचार सोडता येणार नाहीत. त्यांच्याशी एकजुटीने लढावे लागेल, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

मी पहिल्यांदा सन 1958 मध्ये काँग्रेस भवनमध्ये आलो होतो. आज अनेक वर्षांनी पुन्हा आलो आहे. त्याकाळी काँग्रेसमध्ये अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे पुणे असं त्यावेळी समीकरण होतं. काँग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हीन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यामध्ये पुण्यातील काँग्रेस भवनचं योगदान मोठं आहे, असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या 137 व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील काँग्रेस भवनला तब्बल 24 वर्षांनंतर शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : राजकारणाला रोज फाटे फुटताहेत, प्रवक्त्यांची वक्तव्ये ऐकू नये, पाहूच नये अशीच- राज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -