घररायगडनवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवणार

नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवणार

Subscribe

दिबासाहेबांचे नाव आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विमानतळाचे काम बंद पाडण्याची भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्त येथे आले आहेत. भूमिपुत्र आंदोलक आक्रमक होईल आणि तोच धसका घेऊन विमानतळाचे काम बंद केले. चार दिवसापूर्वी झालेल्या सिडको सोबतच्या चार तासाच्या बैठकीत सिडकोचे अधिकारी चर्चेत फक्त वेळकाढूपणा करत होते, असा आरोप माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केला

सिडकोला त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. एवढे होऊनही सिडको वठणीवर आली नाही तर एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवून शेतकर्‍यांची ताकद दाखवून देऊ, असा इशारा सोमवारी देण्यात आला. ओवळे फाटा येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. तेव्हा हा इशारा देण्यात आला.

वारकर्‍यांनी टाळ पखवाजाचा ठेका घेत दिबांचा जयजयकार केला. तर जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, सिडको मुर्दाबाद अशा घोषणा देत प्रकल्पग्रस्तांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचा धसका घेऊन सिडकोने स्वतःच विमानतळाचे काम बंद ठेवले होते. रखरखत्या उन्हात या आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

रायगडला दिबा नावाचे नेतृत्व दैवतासमान मिळाले आहे. भूमिपुत्रांचे हे आंदोलन दीर्घकाळ चालणार आहे, आणि तशी तयारी भूमिपुत्रांनी ठेवली आहे. सरकारची सकारात्मक दृष्टी होत नाही तो पर्यंत आम्ही आक्रमक पवित्रा सोडणार नाही, असे दशरथ पाटील यांनी म्यळे. सिडको एमडींकडे निर्णय क्षमता नसेल तर त्यांनी पद सोडावे, असा सज्जड इशारा देत दशरथ पाटील यांनी राज्यातील सरकार रक्तपिसावू असेल तर रक्त घ्या पण दिबांचे नाव आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा, असे बजावले. राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील यांनीही दिबांच्या नावास पाठींबा दिला आहे. दिबांच्या नावासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी राजकीय चपला बाजूला सारून सहभागी झाले पाहिजे. हे आंदोलन अनेक वर्ष चालेलही पण भूमिपुत्र शांत राहणार नाही आणि भूमिपुत्र अशांत झालं तर सरकार चालवणे कठीण होईल. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मे झाले तसे दिबांच्या नावासाठी १०५ हुतात्मे द्यायला तयार आहोत. पुढील २४ तारखेला पुन्हा आंदोलन करणार आहोत त्याची रणनीती येत्या १० दिवसात जाहीर करू आणि त्याच्यापुढची आंदोलने यशस्वी होईपर्यंत तीव्र अति तीव्र स्वरूपात होतील त्याचबरोबर येत्या काळात पाचही जिल्ह्यातील एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले.

दिबासाहेबांचे नाव आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विमानतळाचे काम बंद पाडण्याची भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्त येथे आले आहेत. भूमिपुत्र आंदोलक आक्रमक होईल आणि तोच धसका घेऊन विमानतळाचे काम बंद केले. चार दिवसापूर्वी झालेल्या सिडको सोबतच्या चार तासाच्या बैठकीत सिडकोचे अधिकारी चर्चेत फक्त वेळकाढूपणा करत होते, असा आरोप माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केला. या मागणीसाठी कितीही आंदोलने करावी लागली तरी चालेल, पण सिडकोला स्वस्थ बसू देणार नाही, असे त्यांनी बजावले. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते वाया जाऊ द्यायचे नसते. हे दिबांनी शिकवले आहे. जो पर्यंत दिबांचे नाव आणि भूमिपुत्रांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत लढाई अधिकाधिक तीव्र केली जाईल, असा इशारा ठाकूर यांनी दिला.

- Advertisement -

सिडको प्रकल्पग्रस्तांना गांभीर्याने घेत नाही, अशी तक्रार करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे निर्णय क्षमता राहिली नसल्याने आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही. दिबांचेसिडको आणि राज्य सरकार भूमिपुत्रांच्या बाबतीत गंभीर नाही हे प्रकर्षाने जाणवत आहे.आज एक दिवस लाक्षणिक आंदोलन केले पण यापुढे बेमुदत काम आंदोलन करावे लागेल आणि येत्या काळात सिडकोचा चक्का जाम करावाच लागेल, असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको व राज्य शासनाला दिला.

विमानतळाला दि.बा.पाटीलांचे नाव देण्याच्या मागणीसाठी एक दिवस लाक्षणिक आंदोलन झाले पण पुढच्यावेळी आंदोलन तीव्र असेल. हे आंदोलन झाले तर सिडकोला पळताभूई थोडी होईल
– जगन्नाथ पाटील, माजी मंत्री

नवी मुंबईतील विमानतळाला दि.बां.चे नाव देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार्‍या सिडकोने लोकभावनेची कदर न करताच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली. आता दिबांच्या नावाची घोषणा होईपर्यंत थांबायचे नाही. ठराव केला असे जाहीर करणारे त्याची नक्कल का देत नाहीत?
– कॉम्रेड भूषण पाटील

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -