घररायगडजिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यात रायगड राज्यात पहिला

जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यात रायगड राज्यात पहिला

Subscribe

जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यात सलग दुसर्‍या वर्षी रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे ३२० कोटी रुपये खर्च करण्यात रायगड जिल्ह्याला यश आले आहे दुसर्‍या क्रमांकावर सिंधुदुर्ग तर तिसर्‍या क्रमांकावर उस्मानाबाद जिल्हा राहिला आहे. निर्धारित वेळेत जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च झाल्याने रायगडच्या पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे.

अलिबाग: जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यात सलग दुसर्‍या वर्षी रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे ३२० कोटी रुपये खर्च करण्यात रायगड जिल्ह्याला यश आले आहे दुसर्‍या क्रमांकावर सिंधुदुर्ग तर तिसर्‍या क्रमांकावर उस्मानाबाद जिल्हा राहिला आहे. निर्धारित वेळेत जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च झाल्याने रायगडच्या पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे.
या आधी सरकारने विविध कारणांनी विकास कामांना ब्रेक लावला होता. तसेच ग्रामपंचायत आणि कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने जिल्ह्यातील विकास रखडला होता. गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन होत असल्याने सरकारी कामांना चांगलाच फटका बसत होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास कामांना निधी वितरण आणि प्रशासकीय मान्यता देताना बराच मनस्ताप सहन करावा लागया. कामकाजासाठी दररोज दोन तास मिळत असल्याने विकासाचा वेग मंदावला होता. त्यामुळे मार्च अखेर निधी खर्च कसा करायचा असा प्रश्न पडला होता. ३२० कोटी रुपयांचा निधी मार्च अखेर खर्च करण्याचे आव्हान जिल्हा नियोजन समितीकडे होते सातत्याने पाठपुरावा करून विकास कामांच्या याद्या आणि त्यांना निर्धारित वेळेत प्रशासकीय मान्यता मिळून देण्यात नियोजन समितीला यश आले आहे.

 निवडणूकीमुळे विकास कामांना खीळ
ग्रामपंचायत, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीमुळे विकास कामांना चांगलीच खीळ बसली होती. तसेच नवीन सरकारने अधूनमधूनविकास कामांना ब्रेक लावला होता. त्यामुळे आधीच विकास कामे उशिराने सुरु झाली होती.त्यातच आयपास प्रणालीचा सर्व्हर डाऊन होत असल्याने मार्च अखेर विकास कामांना प्रशासकीय मान्यता देणे आणि निधी वितरण करणे जिकरीचे झाले होते. यातून मार्ग काढून निर्धारीत वेळेत विकास निधी खर्च करण्याचे शिवधनुष्य जिल्हा नियोजन समितीला पेलावे लागणार असल्याने याबाबत सर्वांनाच सांशकता होती.

- Advertisement -

तब्बल ३२० कोटी रुपयांचा निधी खर्च
सर्वांनीच सहकार्य केल्यामुळे तब्बल ३२० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा नियोजन समितीला यश आले आहे. त्यामुळे रायगड जिल्हा निधी खर्च करण्यात राज्यात सलग दुसर्‍यांदा अव्वल ठरला आहे हा दुसर्‍या क्रमांकावर सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्यांनी १८२ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे त्या खालोखाल उस्मानाबाद ३०० कोटी जालना २८२ कोटी वर्धा २२५ कोटी भंडारा १७५ कोटी गोंदिया २०० कोटी गडचिरोली ३०० कोटी नंदुरबार १४५ कोटी आणि वाशिम जिल्ह्याने २०४ कोटी रुपये निधी खर्च करण्यात यश मिळवले आहे.

१०० टक्के निधी खर्च
१०० टक्के निधी खर्च करण्यात राज्यातील १७ जिल्ह्यांना यश आले आहे त्यामध्ये प्रामुख्याने रायगड सिंधुदुर्ग उस्मानाबाद जालना वर्धा भंडारा गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार, वाशिम, ठाणे, जळगाव, पुणे, मुंबई शहर, लातूर, अमरावती, धुळे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -