घररायगडजिल्ह्याबाहेरील व्यक्तीला रायगड भूषण पुरस्कार, रायगड जिल्हा परिषदेचा महाप्रताप

जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला रायगड भूषण पुरस्कार, रायगड जिल्हा परिषदेचा महाप्रताप

Subscribe

जिल्ह्याच्या जडणघडणीत योगदान असलेल्या ठराविक व्यक्तींना जिल्हा परिषदेकडून रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा मात्र तब्बल २५७ व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. रायगड भूषणची ही खैरात पाहून सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांनी जल्हा परिषदेवर जोरदार टीका केली होती.

रायगड जिल्हा परिषदेने ६ मार्च २५७ व्यक्तींना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केले. मात्र, यामध्ये ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील नामदेव ना. बैकर यांना रायगड भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. बैकर यांना सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला असून यासाठी माजी समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांचे शिफारस पत्र जोडले आहे.
जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला रायगड भूषण पुरस्कार देण्याचा प्रताप जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेने पुरस्कार देताना कोणत्या प्रकारची शहानिशा केली का असाही प्रश्न आता विचारला जात आहे.

जिल्ह्याच्या जडणघडणीत योगदान असलेल्या ठराविक व्यक्तींना जिल्हा परिषदेकडून रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा मात्र तब्बल २५७ व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. रायगड भूषणची ही खैरात पाहून सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांनी जल्हा परिषदेवर जोरदार टीका केली होती. त्यातच ठाणे जिल्ह्यातील नामदेव बैकर यांना रायगड भूषण पुरस्कार देऊन रायगड जिल्हा परिषदेने गोंधळ उडवून दिला आहे.

- Advertisement -

नामदेव बैकर हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील वांगणीजवळील ढवळेपाडा येथील मूळ रहिवासी असून सध्या त्यांचे वास्तव्य बदलापूर नगर परिषद हद्दीमधील खरवई येथे आहे.ते ज्ञानकमळ शिक्षण संस्था वांगणी या संस्थेचे सचिव आहेत. त्यांना रायगड भूषण जाहीर करताना पुरस्कार गठन समितीचे त्यांच्या पत्याबद्दल काही आक्षेप घेतला नाही का? या पुरस्कारासाठी स्टँम्प पेपरवर सत्यप्रतिज्ञापत्र द्यायचे असते त्यात नामदेव बैकर कोणत्या जिल्ह्यातील आहेत याची खात्री रायगड जि.प.पुरस्कार समितीने केली नाही का? बैकर हे शिक्षण संस्था चालक असून शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे त्यांना रायगड जिल्ह्यातील व्यक्तीसाठी दिला जाणारा रायगड भूषण पुरस्कार देण्यात आला आहे का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

याबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी सांगितले की, माझ्या वैयक्तीक कारणांमुळे मी बाहेर असून १६ मार्च रोजी जिल्हापरिषदेमध्ये माहिती घेतल्यानंतर याची माहिती समजेल. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी किरण रावल यांनी, तुम्ही अर्ज करा त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला माहिती मिळेल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -