घररायगडकशेळे व्यापारी खून प्रकरणी स्थानिक दोन तरुणांना अटक

कशेळे व्यापारी खून प्रकरणी स्थानिक दोन तरुणांना अटक

Subscribe

कर्जत तालुक्यातील कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्सचे मालक हरीश तथा हरिसिंह राघोसिंह राजपूत यांचा ३ डिसेंबर रोजी खून झाला होता. त्या खून प्रकरणी पोलिसांनी स्थानिक सावळे गावातील दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या खून प्रकरणातील अन्य तीन ते चार आरोपी फरार असून त्यांचा शोध नेरळ पोलीस घेत असून रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच कर्जत, खालापूर, रोहा पोलीसांच्या पथकांनी नेरळ पोलिसांना गुन्हा उघड करण्यासाठी मदत केली.

कर्जत: कर्जत तालुक्यातील कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्सचे मालक हरीश तथा हरिसिंह राघोसिंह राजपूत यांचा ३ डिसेंबर रोजी खून झाला होता. त्या खून प्रकरणी पोलिसांनी स्थानिक सावळे गावातील दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या खून प्रकरणातील अन्य तीन ते चार आरोपी फरार असून त्यांचा शोध नेरळ पोलीस घेत असून रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच कर्जत, खालापूर, रोहा पोलीसांच्या पथकांनी नेरळ पोलिसांना गुन्हा उघड करण्यासाठी मदत केली, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून पत्रकारांना दिली.
३ डिसेंबर रोजी कशेळे – नेरळ रस्त्यावर रात्री वाकस पुलाजवळ अपघात झाला होता. त्या अपघातात मृत्युमुखी पडलेले कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्स चे मालक हरीश राजपूत यांचा अपघाती मृत्यू नसून परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेता त्यांचा मृत्यू घातपात करून खून झाला असल्याचा गुन्हा नेरळ पोलीस ठाणे येथे ४ डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांच्या अनेक टीम या खून प्रकरणाचा तपास करीत होते आणि त्यात रायगड पोलीस ची गुन्हे अन्वेषण विभागाचे टीम तसेच नेरळ पोलिसांच्या टीम ल कर्जत पोलीस आणि खालापूर तसेच रोहा येथील उपविभागीय अधिकारी यांची पथके मदत करीत होती. पोलिसांनी आपल्या कौशल्याने या खुनाचा तपास लावला असून कशेळे ये घटनास्थळ या भागात कुठेही सीसीटिव्ही कॅमेरे नव्हते. केवळ राजेंद्र ज्वेलर्सचे दुकानासमोर असलेल्या कॅमेरे मध्ये २९ नोव्हेंबर पासून काही व्यक्ती रेकी करीत फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार तपास सुरू झाला होता.अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटना स्थळी जावून तपासी अधिकारी आणि टीम ला मार्गदर्शन केले होते. तपासी अधिकारी नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उप निरीक्षक कदम यांच्या पथकाने हा तपास योग्य दिशेने नेत कशेळे गावात मेकनिक चे दुकान असलेला एक तरुण आणि त्याचा सावळे गावातील मित्र अशा दोघांना या खून प्रकरणी ७ डिसेंबर रोजी चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या कडून खुनाची माहिती मिळाल्यानंतर नेरळ पोलिसांनी सावळे गावातील त्या दोन्ही तरुणांना या गुन्ह्यात रात्री अटक केली आणि त्या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शन नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्यासह पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे टीम पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक कदम, नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत पवार, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या पथकाने या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. पोलिसांच्या माहिती नुसार या गुन्ह्यात किमान तीन ते चार आरोपी असण्याची शक्यता आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी रायगड पोलिसांची तीन पथके तैनात आहेत अशी माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी दिली आहे.

अशी घडली घटना…
अटक करण्यात आलेल्या आरोपीची पूर्वी वसई आणि आता सोलापूर येथे राहत असलेल्या छगन राम पटेल याच्यासोबत असलेल्या ओळखी मधून या खुनाचा प्लॅन करण्यात आला होता. पटेल हा सावळे गावाचा जावई असून त्यांचे आणि अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांचे चांगले संबंध होते. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या छगन पटेल ने काही काम असल्यास गेम वाजवता येईल असे सांगितले होते. त्यानुसार त्या सर्वांनीच २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी कशेळे येथे राजेंद्र ज्वेलर्स या दुकानाची रेकी केली होती.त्यानंतर छगन पटेल याने सापळा रचला आणि प्लॅन नुसार सावळे गावातील एका तरुणाला पत्नीची सोन्याची गंठण गानवठ ठेवून दोन लाख रुपये उलचण्याचा प्लॅन केला होता. हा प्लॅन त्या सावळे गावातील तरुणाने ३ डिसेंबर रोजी केला आणि रात्री संबंधित व्यापारी घरी जाण्यासाठी नेरळ स्टेशन कडे जात असताना त्याला लुटण्याचा इरादा करून सावळे गावातील एक तरुण कशेळे येथून हरीश राजपूत यांचा पाठलाग करीत आला होता.

- Advertisement -

…. धारदार शस्त्राने वार करून खून
त्यानंतर वाकस गावाच्या अलीकडे त्याने तेथे दबा धरून बसलेल्या झायलो गाडी मधील लोकांना हरीश राजपूत यांना दाखवले. त्यानंतर राजपूत यांच्या बाईक च्या मागे झायलो असा पाठलाग सुरू होता. शेवटी वाकस पुलाच्या पुढे वळणावर जिते गावाच्या हद्दीत झायलो गाडीने राजपूत यांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर पटेल आणि त्याचे सहकारी यांनी राजपूत यांच्याकडील बॅग हिसकावून घेण्याचा इराद्याने चाकूने वाऱ केले. राजपूत हे मजबूत शरीर यष्टी चे असल्याने ऐकत नसल्याने शेवटी त्यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. राजपुत यांच्या पोटात १२ ठिकाणी तर मानेवर आणि पायावर गुडघ्याजवल वार करण्यात आले होते.खून करून ते पुन्हा कशेळे रस्त्याने पळून गेले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -