घरताज्या घडामोडीमोदीजी आव्या गुजरात मा ..! गुजरातच्या ऐतिहासिक विजयावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

मोदीजी आव्या गुजरात मा ..! गुजरातच्या ऐतिहासिक विजयावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

संपूर्ण देशाचं लक्ष गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांवर लागलं होतं. यावेळी दोन्ही राज्यांच्या विधानसभेचे निकाल समोर आले असून गुजरातमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने विजयाची आघाडी मिळवली आहे. दरम्यान, गुजरातच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजपसह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काहींनी टीकास्त्र सुद्दा सोडले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत जिंकलेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत मोदींचे आभार मानले आहेत.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

- Advertisement -

केम छो , मजामा ?, मोदी जी आव्या गुजरात मा !!, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

- Advertisement -

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने सलग सातव्यांदा सत्ता काबीज केली आहे. या विजयानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपाच्या मुख्य कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी मोदींनी जनता जनार्दनापुढे नतमस्तक होतो म्हणत आशीर्वाद घेतले.

भाजपला मिळालेला जनसमर्थन महत्त्वाचा आहे, कारण भारताने अमृत कालात प्रवेश केला आहे. भाजपला मिळालेला जनसमर्थन हे नव्या भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे, तरुणांच्या विचारसरणीचे प्रकटीकरण आहे. गरीब, दलित, वंचित, मागास, शोषित आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी आहे. सर्वात मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद भाजपमध्ये आहे. भाजपला मिळणारे जनसमर्थन दर्शवते की, कौटुंबिक वाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेचा रोष सतत वाढत आहे. मला हे सुदृढ लोकशाहीसाठी चांगले लक्षण वाटते. यावेळी गुजरातने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. मी सर्व भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि गुजरातच्या जनतेला विशेष सलाम करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करतो – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे. त्यामुळे आप पार्टी ही दिल्लीपुरता मर्यादित आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करतो. मी देखील प्रचाराला गेलो. तेव्हा जनतेचा मूड स्पष्टपणे दिसत होतो. गुजरात मोदीमय आणि भाजपमय होतं. निवडून आलेल्या सर्व आमदारांना मी शुभेच्छा देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : आप नावाच्या पार्टीचे १२ वाजले, तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार; फडणवीसांचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -