घररायगडखोपोली नगरपरिषद निवडणूकीची प्रभाग रचना जाहीर

खोपोली नगरपरिषद निवडणूकीची प्रभाग रचना जाहीर

Subscribe

खोपोली नगरपरिषदेच्या काही प्रभागांची रचना पाहता प्रस्थापितांना धक्का देण्याचा काहीसा प्रकार असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. मात्र, प्रभागरचना कशीही असली तरी शहरभर केलेल्या कामांच्या बळावर आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ अशी प्रतिक्रिया काही लोकप्रतिनिधींनी दिली आहे.

खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठी प्रभाग रचनेचा प्रारुप आरखडा व नकाशे गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आले. प्रभाग रचना कशी झाली आहे, कोणता भाग यामध्ये समाविष्ट आहे, कोणता वगळण्यात आला आहे, चर्तुसिमा कशा आहेत हे पाहण्यासाठी सकाळपासून नगरपरिषद कार्यालयात झुंबड पहायला मिळाली.

प्रारुप प्रभागरचना पाहून इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम पहायला मिळाला. खरे तर प्रभागरचना ही गोपनीय असावी अशा निवडणूक आयोगाच्या सूचना असल्यातरी त्या करताना सत्ताधारी मंडळींचा हस्तक्षेत व त्याच्या सोयीनुसार रचना केली जात असल्याचे उघड सत्य आहे. खोपोली नगरपरिषदेच्या काही प्रभागांची रचना पाहता प्रस्थापितांना धक्का देण्याचा काहीसा प्रकार असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. मात्र, प्रभागरचना कशीही असली तरी शहरभर केलेल्या कामांच्या बळावर आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ अशी प्रतिक्रिया काही लोकप्रतिनिधींनी दिली आहे. प्रारुप प्रभाग रचनेवर कोणाची हरकत व सूचना असल्यास त्यांनी १७ मार्च दुपारी ३ वाजेपर्यंत मुख्याधिकारी कार्यालयात सादर करायच्या आहेत.

- Advertisement -

कोरोनामुळे २०२१ सालची जनगणना झाली नसल्याने मागील दहा वर्षात वाढलेली अंदाजित लोकसंख्या विचारात घेता येणार्‍या निवडणुकीत खोपोली नगरपरिषदेत नगरसेवकांची संख्या ३१ आहे. प्रभाग संख्या १४ आहे. गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, खोपोली शहरातील लोकसंख्या ७१ हजार १४१ असून यापैकी ६७२१ लोकसंख्या अनुसूचित जातीची तर ३०६५ लोकसंख्या अनुसूचितजमातीची आहे. एक प्रभाग २ नगरसेवक अशी रचना असणार आहे. निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना असल्याने ओबीसी लोकसंख्या वेगळी दर्शविण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -