घररायगडनेरळ -कळंब राज्य मार्गाचे काम रखडले, अर्धवट खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळेअपघाताची शक्यता

नेरळ -कळंब राज्य मार्गाचे काम रखडले, अर्धवट खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळेअपघाताची शक्यता

Subscribe

सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत हे काम होणार असून या कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील काही भाग हा सिमेंट क्रॉक्रिटीकरणाचा आहे. तर काही भाग डांबरीकरणाचा करण्यात येणार असल्याची माहिती उप अभियंते अक्षय चौधरी यांनी दिली.

नेरळ – कळंब राज्यमार्गावर साई मंदिर नाका ते धामोतेपर्यंत रस्ता कामासाठी खोदून ठेवला आहे. मात्र, दोन महिने उलटूनही या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे खोदलेल्या रस्त्याचा अंदाज वाहनचालकाला न आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष करून रात्रीच्या वेळेस हा रस्ता धोकादायक ठरू शकतो.

सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत हे काम होणार असून या कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील काही भाग हा सिमेंट क्रॉक्रिटीकरणाचा आहे. तर काही भाग डांबरीकरणाचा करण्यात येणार असल्याची माहिती उप अभियंते अक्षय चौधरी यांनी दिली. या राज्य मार्गाच्या एका लेनचे काम झाले आहे. मात्र त्याच्या लगतची लेन करण्यासाठी खोदकाम करून ठेवले आहे. मात्र सद्या हे काम बंद आहे.

- Advertisement -

अपूर्ण कामामुळे वाहतुकीला अडथळा ठरून वाहनांचा वेगही मंदावत आहे. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु करावे, अशी मागणी कोल्हारे ग्राम पंचायतीचे सदस्य विजय हजारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. तर नेरळ कळंब राज्य मार्ग असूनही अशा प्रकारे कासव गतीने काम सुरु आहे हे योग्य नाही. हा वर्दळीचा रस्ता खोदून ठेवला आहे. या अर्धवट कामामुळे प्रवाशाचा अपघात झाला तर सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी जबाबदार असेल असे धामोते येथील अमोल चव्हाण यांनी म्हटले आहे.

कामाची जानेवारीमध्ये वर्क ऑर्डर निघाली आहे. प्लँट ऑपरेटची काही समस्या होती. मात्र आता ती दूर झाली असून कामास लवकरच सुरवात करण्यात येईल.
– अक्षय चौधरी, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

- Advertisement -

एका बाजूचे काँक्रिटीकरण झाले तर दुसर्‍या बाजुचे काम थांबले आहे. रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराने घेतले आहे, त्या ठेकेदाराने नक्की कोणत्या कारणामुळे काम थांबविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश ठेकेदारास द्यावेत.
– विजय हजारे, सदस्य, कोल्हारे ग्रामपंचायत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -