घरक्रीडाVideo : धवनचे 'बाल बाल बचे'

Video : धवनचे ‘बाल बाल बचे’

Subscribe

भारताचा सलामीवीर शिखर धवने एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यांनी या व्हिडिओला 'बाल बाल बचे' अशी कॅप्शन दिली आहे.

भारताचा अकबर शिखर धवन न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली खेळी खेळत चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा भारताचा सलामीवीर शिखर धवन चर्चेत आला आहे. मात्र तो त्याच्या कामगिरीने नाही तर त्याच्या मुलाच्या म्हणजेच छोट्या अकबरच्या कामगिरीने चर्चेत आला आहे. शिखर धवनने आपल्या मुलासोबतचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामुळे शिखर धवनच्या या व्हिडिओची चर्चा सुरु आहे.

असा आहे हा व्हिडिओ

शिखर धवनने आपल्या मुलासोबतचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवन आपला मुलगा झोराव्हर याच्यासोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शिखरचा मुलगा झोराव्हर त्याच्या खांद्यावर बसून शिखरच्या डोक्यात एक पांढरा असा पदार्थ टाकत असल्याचे दिसत आहे. तसेच या व्हिडिओला धवनने एक गंमतीशीर अशी कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘माझ्या मुलाने केस वाढवण्याच्या दृष्टीने शोधलेला हा उपाय’ आहे. अशी गंमतीशीर कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली असून ‘बाल बाल बचे’ असे देखील लिहीले आहे.

- Advertisement -


वाचा – शिखरचे ट्विटर हॅक झाले आणि

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -