घरमुंबईभाजपाच्या घोषणा म्हणजे चुनावी जुमला - अशोक चव्हाण

भाजपाच्या घोषणा म्हणजे चुनावी जुमला – अशोक चव्हाण

Subscribe

'आम्ही दिलेला शब्द पाळतो तर भाजपा दिलेला शब्द फिरवतो' अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

”आजवर काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली. मात्र भाजपा नुसती घोषणाबाजी करते आहे. घोषणा करायची आणि प्रत्यक्षात काहीच मदत करायची नाही त्यामुळे भाजपाकडून सध्या होत असलेल्या घोषणा म्हणजे निवडणुकांच्या तोंडावरचा ‘चुनावी जुमला’ आहे”, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे केली. भाजपा सरकारची कामगिरी शून्य असून, त्यांच्या काळात कुपोषण वाढल्याचा आरोप देखील अशोक चव्हाण यांनी केला. तसेच ‘आम्ही दिलेला शब्द पाळतो तर भाजपा दिलेला शब्द फिरवतो’ अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. दरम्यान राहुल गांधी येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली तर देशातील प्रत्येक गरीब नागरिकाला किमान उत्पन्न हमी दिली जाईल, अशी घोषणा केली त्याचे स्वागत आज काँग्रेसकडून करण्यात आले. त्यामुळे नाकर्त्या मोदी सरकारने निर्माण केलेल्या गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्येवर काँग्रेस पक्षाने हे ऐतिहासिक पाऊल उचलण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगत मोदींवर जोरदार टीका केली.

एमआयएम सोबत आघाडी नाही

दरम्यान भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेतली. याबद्दल अशोक चव्हाण यांना विचारले असता, ‘आंबेडकर यांच्याशी बोलणी सुरू असल्याची माहिती आहेत पण एमआयएमबरोबर कोणत्याही परिस्थितीत आघाडी होणार नसल्याचे’, त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस राज्य निवड मंडळाची बैठक सुरू, लातुरमध्ये इच्छुकांची यादी वाढली.

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षाची लगबग सुरू असून, आज काँग्रेसने राज्य निवड मंडळाची बैठकी बोलावली आहे. थोड्यावेळापूर्वीच या बैठकीला सुरुवात झाली असून, अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, संजय निरुपम, नसीम खान, मिलिंद देवरा, हे देखील उपस्थित आहेत. टिळक भवन येथे ही बैठक सुरू असून लोकसभा उमेवारांची यादी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस राज्य निवड मंडळाची दोन दिवशीय बैठक महत्वाची ठरणार आहे. आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानंतर उद्या हाय कमांड कडे अंतिम यादी पाठवली जाणार असून, प्रत्येक मतदार संघातून दोन किंवा दोन पेक्षा अधिक नावे पाठविण्याचे काँग्रेस हायकमांडचे आदेश देण्यात आले आहेत.

लातूरमध्ये सर्वाधिक इच्छुक उमेदवार

दरम्यान लातूर जिल्ह्यातुन सर्वाधिक इच्छुक उमेदवार असून, लातूर जिल्ह्यातुन ५१ हुन अधिक तर नागपूरहूनही तितकेच इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे इच्छुक कितीही असले तरी आज अंतिम दोन ते तीन नावे ठरवली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -