घरक्रीडानिवृत्तीनंतर भाजपच्या 'या' नेत्याने दिली धोनीला निवडणूक लढविण्याची ऑफर

निवृत्तीनंतर भाजपच्या ‘या’ नेत्याने दिली धोनीला निवडणूक लढविण्याची ऑफर

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. निवृत्त झाल्यानंतर काय करणार याबाबत धोनीने कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र, धोनीला राजकारणात येण्याची ऑफर मिळाली आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफर दिली आहे.

महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्टला संध्याकाळी निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. निवृत्ती जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, एम. एस. धोनी फक्त क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. संकटांविरोधात लढा देण्याचे त्याचे कौशल्य आणि क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता सार्वजनिक जीवनात खूप आवश्यक आहे. धोनीने २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवावी, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.

- Advertisement -

धोनीसाठी एक फेअरवेल सामना व्हावा – हेमंत सोरेन

धोनी निवृत्त झाल्याच्या बातमीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, देश आणि झारखंडला अभिमान आणि उत्साहाचे अनेक क्षण देणारा माही आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आता आम्हाला निळ्या जर्सीमध्ये झारखंडचा लाल दिसणार नाही परंतु देशवासीयांचे मन अद्याप भरलेलं नाही. माहीसाठी फेअरवेल सामना रांची येथे व्हावा, असं हेमंत सोरेन म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – निवृत्ती जाहीर करण्याआधी धोनी कुठे आणि काय करत होता?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -