Corona Live Update : निलेश राणेंना कोरोनाची लागण!

coronavirus live update
लाईव्ह अपडेट

माजी खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांना ट्विटरच्या माध्यामातून माहिती दिली आहे.


धारावीत आज ५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ६६८वर पोहोचला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.


देशात १५ ऑगस्ट पर्यंत २ कोटी ९३ लाख ९ हजार ७०३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी काल दिवसभरात ७ लाख ४६ हजार ६०८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


 

 

देशात गेल्या २४ तासांत ६३ हजार ४८९ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले असून ९४४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झील आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २५ लाख ८९ हजार ६८२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४९ हजार ९८० रुग्णांचा मृत्यू झाला असून १८ लाख ६२ हजार २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ७७ हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


औरंगाबाद कोरोनामुळे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू .घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. 9 ऑगस्टला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल संध्याकाळी सहा वाजता मृत्यू झाला. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ५७९ वर पोहचली आहे.


गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाच्या ६५ हजार रुग्णांचे निदान झाले, तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील कोरोना रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजार १९२ वर पोहोचली आहे. देशात आत्तापर्यंत ४९ हजार ३६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.