घरक्रीडाRavindra Jadeja : कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा अन् जडेजाचे सूचक ट्विट

Ravindra Jadeja : कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा अन् जडेजाचे सूचक ट्विट

Subscribe

भारतीय संघ गुरूवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जोहान्सबर्गला रवाना झाला आहे

भारतीय संघ गुरूवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जोहान्सबर्गला रवाना झाला आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूध्द येथे २६ डिसेंबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मात्र संघाचे दोन स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर गेले आहेत. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी काही माध्यमांमध्ये जडेजा कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेणार अशी चर्चा रंगली होती. त्यामध्ये म्हंटले की, जडेजाची दुखापत गंभीर आहे आणि तो चार ते सहा महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतो. अशातच तो कसोटी क्रिकेटमधून संन्यास देखील घेऊ शकतो. दरम्यान, याबाबतीत जडेजाने अधिकृतरित्या काहीही भाष्य केले नाही मात्र त्याने बुधवारी दोन वेगवेगळी ट्विट करून माध्यमांच्या त्या चर्चांना पूर्णविराम दिला.

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट करून लिहले की, “खोटे मित्र अफवांवर विश्वास ठेवतात. खरे मित्र तुमच्यावर विश्वास ठेवतात.” या ट्विटनंतर थोड्या वेळातच कसोटी संघाच्या जर्सीमध्ये आणखी एक फोटो पोस्ट केला. त्यात म्ंहटले की, “खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.”

- Advertisement -

- Advertisement -

३३ वर्षीय जडेजा सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि आपल्या अष्टपैलू खेळीतून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. तो विदेशी दौऱ्यासाठी भारतीय संघाची पहिली पसंद राहिला आहे.

रवींद्र जडेजाने त्याच्या कारकिर्दित आतापर्यंत ५७ कसोटी सामन्यांत २३२ बळी पटकावले आहेत. गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतही कमाल केली आहे. त्याने १७ अर्धशतक आणि शतकीय खेळीच्या जोरावर २१९५ धावा केल्या आहेत.


हे ही वाचा: http://PAK vs WI Series : मालिकेवर कोरोनाचे सावट; आणखी ५ खेळाडूंना कोरोनाची लागण \


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -