घरक्रीडाIND vs PAK: पराभवानंतर बाबर आझम संतापला, चाहत्यांवर काढला राग ; पाहा...

IND vs PAK: पराभवानंतर बाबर आझम संतापला, चाहत्यांवर काढला राग ; पाहा व्हिडीओ

Subscribe

आशिया कपच्या सुपर-4 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर 228 धावांनी शानदार विजय नोंदवला. या विजयानंतर भारतीय चाहते खूप आनंदी दिसत होते, पण कदाचित पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा पराभव सहन करू शकला नाही. पाकिस्तानच्या या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम चाहत्यांवर नाराज होताना दिसला.

आशिया कपच्या सुपर-4 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर 228 धावांनी शानदार विजय नोंदवला. या विजयानंतर भारतीय चाहते खूप आनंदी दिसत होते, पण कदाचित पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा पराभव सहन करू शकला नाही. पाकिस्तानच्या या पराभवानंतर कर्णधार बाबर आझम चाहत्यांवर नाराज होताना दिसला. (Asia Cup 2023 IND vs PAK Babar Azam furious after defeat takes out on fans Watch the video )

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चाहत्यांवर नाराज होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की बाबर मैदानाबाहेर जात आहे, त्याच दरम्यान एका चाहत्याने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बाबर तिथून निघून गेला. चाहत्याने पुन्हा एकदा बाबरसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी बाबर आझम रागाने काहीतरी बोलताना दिसत आहे.

- Advertisement -

बाबर आझमचा राग पाहून तो चाहता सेल्फी न घेता शांतपणे माघारी गेला. पाकिस्तानच्या कर्णधाराचा हा संतप्त व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बाबर संतापलेल्या चाहत्याला हातवारे करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

- Advertisement -

बाबर फलंदाजीत ठरला अपयशी

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि नंबर वन वनडे फलंदाज बाबर आझम भारताविरुद्धच्या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला 24 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने केवळ 10 धावा करता आल्या. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने बाबरचा विकेट घेतला. हार्दिकने उत्कृष्ट गोलंदाजी करत बाबरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठा विजय नोंदवला

भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 2 बाद 356 धावा केल्या होत्या. संघासाठी केएल राहुल आणि विराट कोहलीने शतके, रोहित शर्मा आणि शुभमन गिलने अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 32 षटकांत सर्वबाद 128 धावांवर आटोपला. अशाप्रकारे भारताने 228 धावांनी विजय मिळवला, जो एकदिवसीय क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे.

(हेही वाचा: India VS Pakistan: आम्ही बॉम्ब घेऊनच बसलोय का? पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला संताप )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -