Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Asia Cup 2023 : भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाने केली निवृत्ती जाहीर

Asia Cup 2023 : भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाने केली निवृत्ती जाहीर

Subscribe

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना म्हटलं की प्रत्येक क्रिकटे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचते. यंदा भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप 2023 (Asia Cup 2023) आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) मध्ये लागोपाठ आमनेसामने येणार आहेत. मात्र त्यापूर्वी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज वहाब रियाझने निवदेनाद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याने याबाबत ट्वीटही केले आहे. असे असले तरी फ्रँचायझी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. (Asia Cup 2023 The Pakistani bowler who became a headache for India announced his retirement)

हेही वाचा – Article 370 : आधी करीत होती मोदी सरकारवर टीका आता एकदमच बदलले तिचे सूर; वाचा कोण ती?

- Advertisement -

38 वर्षीय वहाब रियाझ याने निवेदनात म्हटले की, मी गेल्या दोन वर्षांपासून निवृत्तीच्या योजनांबद्दल विचार करत होतो.  मी माझ्या देशाची आणि राष्ट्रीय संघाची पूर्ण सेवा केल्याने मला आता पूर्वीपेक्षा अधिक चांगले वाटत आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सन्मान आणि विशेषाधिकार आहे. यासह, फ्रँचायझी क्रिकेटमध्ये एका नवीन प्रवासाला सुरुवात करताना मी आनंदी आहे.

- Advertisement -

वहाब रियाझने पाकिस्तानसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2020 मध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करताना खेळला होता. याशिवाय तो या वर्षाच्या सुरुवातीला मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या टी-20 सुपर लीगमध्ये खेळताना दिसला होता. वहाब रियाझ हा त्या पाकिस्तानी गोलंदाजांपैकी एक आहे, ज्याने आपल्या गोलंदाजीने पाकिस्तान क्रिकेटला खूप काही दिले आहे. त्यामुळे आशिया कप आणि विश्वचषकापूर्वी त्याने निवृत्ती जाहीर केल्यामुळे पाकिस्तान संघासाठी एक मोठे आव्हान म्हणून पाहिले जात आहे. मात्र, पाकिस्तान संघात सामील होण्यासाठी युवा वेगवान गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. सध्या पाकिस्तानची गोलंदाजी लाइनअपही पूर्वीपेक्षा मजबूत झालेली पाहायला मिळत आहे.

वहाबने सांगितले की, 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची त्याची योजना होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून खेळणे हा त्याच्यासाठी मोठा सन्मान आहे. त्याने असेही म्हटलेकी, भविष्यात फ्रँचायझी क्रिकेट लीगमध्ये भाग घेऊन क्रिकेटचा प्रवास सुरू ठेवण्याचा मानस आहे. वहाब रियाझच्या निवृत्तीने पाकिस्तानी क्रिकेटच्या एका युगाचा अंत झाला आहे. कारण त्याचा वेगवान गोलंदाजीचा पराक्रम आणि संघातील योगदान चाहत्यांना आणि सहकारी क्रिकेटपटूंना सारखेच स्मरणात राहील.

हेही वाचा – न्यायालयात महिलांसाठी ‘हे’ शब्द आता वापरले जाणार नाहीत; सर्वोच्च न्यायालयाने हँडबूक केलं जारी

वहाबची भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी

वहाब रियाझने भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. त्याने 2011 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 10 षटकात 46 धावांत भारताच्या 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग आणि एमएस धोनीसारख्या मोठ्या खेळाडूंना बाद केले होते. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या युवराज सिंगला त्याने पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत केले होते. यासोबतच 2015 च्या विश्वचषकातही शेन वॉटसनविरुद्धचा त्याचा स्पेल क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पेलमध्ये गणला जातो.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

डावखुऱ्या वेगवान गोलंदाज वहाब रियाझने 2008 मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या कारकिर्दीत त्याने 91 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय, 27 कसोटी सामने आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 120, कसोटीत 83 आणि टी-20 मध्ये 34 अशा एकूण 237 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय वहाब रियाझच्या सर्व फॉरमॅटमध्ये 1200 धावा केल्या आहेत.

- Advertisment -