घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द; मंत्री गिरीश महाजनांची ग्वाही

जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द; मंत्री गिरीश महाजनांची ग्वाही

Subscribe

नाशिक : राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी सातत्याने नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर अनेक नवीन संकल्पना राबवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून त्यांचे काम अभिनंदनीय आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासन सदैव कटीबद्ध आहे, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतीराज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शहाजी उमाप,नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी उपस्थित होते.

- Advertisement -

ग्रामविकासमंत्री महाजन पुढे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य संग्रामात नाशिक जिल्ह्यातील वीरांची भूमिका महत्वाची आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे नाशिकचे भूषण आहे. त्याचप्रमाणे येवला येथील जन्मभूमी असलेले तात्या टोपे, कलेक्टर जॅक्सनची विजयानंद थिएटरमध्ये हत्या करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या सारख्या जिल्ह्यातील ज्ञात व अज्ञात असलेल्या क्रांतिकारांचे बलिदान आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शासन आपल्या दारी, मिशन भगीरथ, तसेच शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेत नाशिक जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगितले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी ग्रामविकासमंत्री यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.

यांचा झाला सन्मान

शामराज बाबुराव गडाख, (पोलीस उपनिरीक्षक , पोलीस अधीक्षक (ग्रामीण) नाशिक) यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक, २०२३, आनंद महादु वाघ (सहा पोलीस आयुक्त,नाशिक) संजय उध्दव जाधव, (सहा. पोलीस उप निरीक्षक, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र) यांना गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल पोलीस पदक प्रदान करण्यात आले. अय्युबखान अहमदखान पठाण, स.क्र. १५९६८, कंपनी नायक यांना होमगार्ड व नागरी संरक्षण दलात विशेष व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक घोषित केल्याबद्दल सत्कार व सन्मान करण्यात आला

- Advertisement -

विद्यार्थ्यांचा गौरव

पूर्व उच्च प्राथमिक / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) फेब्रुवारी २०२३ मध्ये यश संपादन करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविणा-या श्रीजीत अहिरे, शौर्य देवरे, ओजस काबरा, कौस्तुभ नेमाडे, स्वेत भोकरे, अक्षरा लोंढे व आर्यन सुरसे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -