घरक्रीडाAsian Games 2018: महिला हॉकी संघाला रौप्यपदक

Asian Games 2018: महिला हॉकी संघाला रौप्यपदक

Subscribe

भारतीय महिला हॉकी संघ एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला असल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. जपानने भारताला २-१ च्या फरकाने पराभूत केले आहे.

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताचा महिला हॉकी संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला असल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. तर जपानच्या महिला संघाने भारताला अंतिम सामन्यात २-१ च्या फरकाने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केले आहे.

- Advertisement -

असा झाला सामना 

भारत आणि जपान यांच्यातील सामना सुरूवातीपासूनच चुरशीचा सुरू होता. सामन्याच्या ११ व्या मिनीटालाच भारताच्या बचावफळीला भेदत जपानच्या शिमझूने गोल करत सामन्यात जपानला १-० ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताच्या नेहा गोयलने २५ व्या मिनीटाला गोल करत सामन्यात भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर मध्यांतरापर्यंत १-१ असाच स्कोर होता. त्यानंतर दोन्ही संघांकडून गोल करण्याचे काही प्रयत्न करण्यात आले. मात्र एकाही संघाला गोल करण्यात यश आले नाही. मात्र ४४ व्या मिनीटाला जपानने गोल करत सामन्यात २-१ ची आघाडी मिळवली. सामन्याच्या अखेर पर्यंत भारताला बरोबरी साधता न आल्याने जपानने सामन्यात २-१ ने विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -