घरक्रीडागॅरी कस्टर्न यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

गॅरी कस्टर्न यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या प्रशिक्षकपदी भारताला २०११ वर्ल्ड कप जिंकवून देणारे प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांची नियुक्ती झाली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने काही दिवसांपूर्वी डॅनियल व्हिट्टोरीची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली होती. आता त्याच्या जागी गॅरी कस्टर्नची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही आयपीएल सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरला चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. त्यामुळे व्हिट्टोरीला प्रशिक्षक पदावरून काढण्यात आले होते.


भारताला २०११ वर्ल्ड कप जिंकवून देण्यात मोलाचा वाटा

२०११ मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेश इथे झालेला वर्ल्ड कप भारताला जिंकवून देण्यात कस्टर्न यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता आरसीबीला आयपीएल जिंकून देण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे.

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरला अजूनही आयपीएल जिंकण्यात अपयश 

आरसीबीमध्ये विराट कोहली, एबी डीविलियर्स, क्रिस गेल यासारखे मोठमोठे खेळाडू असूनही त्यांना आयपीएल एकदाही जिंकता आलेले नाही. २००९ आणि २०११ अशा दोन वर्षी ते फायनलमध्ये खेळले होते. त्यात त्यांचा पराभव झाला होता. तर मागील दोन वर्ष त्यांना प्लेऑफमध्येही प्रवेश करता आलेला नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -