घरक्रीडाविकास कृष्णन अंतिम फेरीत

विकास कृष्णन अंतिम फेरीत

Subscribe

आशियाई ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग

भारताचा आघाडीचा बॉक्सर विकास कृष्णनने (६९ किलो) आशियाई ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अमित पांघल (५२ किलो) आणि महिलांत लोव्हलिना बॉर्गोहेन (६९ किलो) यांना मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिघांनीही या स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठत यावर्षी होणार्‍या टोकियो ऑलिम्पिकमधील आपला प्रवेश निश्चित केला होता.

पुरुषांच्या ६९ किलो वजनी गटात विकास कृष्णनने कझाकस्तानच्या दुसर्‍या सीडेड अब्लाईखान झुसुपोव्हचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे त्याला किमान रौप्यपदक मिळणार हे निश्चित झाले आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना जॉर्डनच्या ऐशाह हुसेनशी होईल. तसेच या स्पर्धेत पदार्पण करणार्‍या सचिन कुमारच्या (८१ किलो) ऑलिम्पिक प्रवेशाच्या आशा जिवंत आहे. ५२ किलो वजनी गटात अमित पांघलने मात्र निराशा केली. त्याला या वजनी गटात सुवर्णपदक मिळवण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, उपांत्य फेरीत जियांग्वान हूने ३-२ असे पराभूत केल्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

मेरी ऑलिम्पिकसाठी पात्र

भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम (५१ किलो) आणि सिमरनजीत कौर (६० किलो) यांनी आशियाई ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे या दोघी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्या आहेत. मेरीने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपिन्सच्या आयरिश मांगोचा ५-० असा पराभव केला. दुसरीकडे सिमरनजीतने मंगोलियाच्या मोंखोरवर ५-० अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -