घरताज्या घडामोडीभाजपने मध्य प्रदेशातील आमदारांना हलविले

भाजपने मध्य प्रदेशातील आमदारांना हलविले

Subscribe

भाजपनं आपले आमदार दुसऱ्या राज्यात हलवले असले, तरी त्यांना कोणत्या राज्यात ठेवणार यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत त्यांच्या १९ समर्थक आमदारांनी आपले राजीनामे दिले. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार संकटात सापडले आहे. सध्या काँग्रेसकडून बहुमत सिद्ध करणार असल्याचा दावा केला जात असला, तरी भाजप सर्तक झाली आहे. भाजपनं आपल्या आमदारांना दुसऱ्या राज्यात हलवण्याचं काम सुरू केलं आहे. आमदारांना घेऊन बस रवाना झाल्या आहेत. मंगळवारी ११ वाजताच्या सुमारास बस भोपाळ एअरपोर्टवर पोहोचली होती. भाजपनं आपले आमदार दुसऱ्या राज्यात हलवले असले, तरी त्यांना कोणत्या राज्यात ठेवणार यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या आमदारांना दिल्ली, बंगळुरू, गुजरात वा हरयाणामध्ये ठेवलं जाऊ शकतं अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया हे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण, पक्ष प्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली. त्यानंतर मध्य प्रदेश भाजप प्रदेश कार्यालयासमोर ट्रव्हल बस लागल्या. भाजपा आपल्या आमदारांना दुसऱ्या राज्यात हलवत असल्याची बातमी पसरली.

- Advertisement -

ज्योतिरादित्यांच्या राजीनाम्याने बसला काँग्रेसला मोठा धक्का

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला. विशेषतः मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या सरकारसमोरील अडचणी या राजीनाम्यानं वाढवल्या आहेत.

- Advertisement -

काँग्रेसवर ज्योतिरादित्य सिंधिया नाराज

मध्य प्रदेशामध्ये कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेल्याने ज्योतिरादित्य सिंधिया नाराज झाले होते. ही नाराजी उघडपणे समोर आली होती. आज मोदी-शाह यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे राज्यसभेवर भाजपातर्फे उमेदवारी आणि त्यानंतर केंद्रात मंत्रिपद अशी ऑफर सिंधिया यांना मिळाली असावी अशी शक्यता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -