घरक्रीडावाईट बातमी! प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह, 'आशिया चषक'साठी जाणार नाही

वाईट बातमी! प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह, ‘आशिया चषक’साठी जाणार नाही

Subscribe

बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याच्यासोबत युवा आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांना संघात स्थान देण्यात आले आहेत. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हर्षल पटेलचाही दुखापतीमुळे संघात समावेश नाही

नवी दिल्ली: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मंगळवारी कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते यूएईमध्ये होणाऱ्या आगामी आशिया कप 2022 साठी संघात सामील होऊ शकणार नाहीत. आशिया चषक 2022 ला 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि टीम इंडिया आपला पहिला सामना (भारत विरुद्ध पाकिस्तान) 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठीही द्रविडने भारतीय संघासोबत दौरा केला नव्हता.

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर द्रविडला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले होते. आगामी मेगा टूर्नामेंटमध्ये रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. तर विश्रांतीनंतर विराट कोहली संघात परतला आहे. भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याच्यासोबत युवा आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांना संघात स्थान देण्यात आले आहेत. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हर्षल पटेलचाही दुखापतीमुळे संघात समावेश नाही.

- Advertisement -


आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.


हेही वाचाः मृत संदेश दळवी गोविंदाला 10 लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत माहिती

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -