घरक्रीडाहार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलचे निलंबन मागे

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलचे निलंबन मागे

Subscribe

सीबीआयने हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांचे निलंबन मागे घेतले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावरील निलंबन अखेर बीसीसीआयने मागे घेतले आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयने निलंबन मागे घेतल्यामुळे आता हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना न्यूझीलंडसोबत सुरु असलेल्या सामन्यांमध्ये खेळता येणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

- Advertisement -

…म्हणून बीसीसीआयने केली होती कारवाई

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये हार्दिक पांड्याने स्त्रियांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटीजन्सनी हार्दिक पांड्यावर टीकेची झोड केली होती. या कार्यक्रमात हार्दिक पांड्यासोबत लुकेश राहुल देखील होता. त्यामुळे बीसीसीआयने हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल दोघांवर निलंबणाची कारवाई केली होती. बीसीसीआयने केलेल्या निलंबणाच्या कारवाईमुळे त्यांना ऑस्ट्रेलियावरुन न खेळता मायदेशी परतावे लागले होते. हार्दिकने याप्रकरणी आपल्या चाहत्यांची माफी देखील मागितली होती. त्याने स्वत:ला बंद खोलीत डांबून घेतले होते.

पांड्याचं वादग्रस्त विधान

हार्दिक पांड्याने ‘कॉफी विथ करण’या कार्यक्रमामध्ये म्हटले होते की, ‘मी अनेक महिलांसोबत रिलेशिनशिपमध्ये होतो. ही बाब माझ्या पालकांना माहित होती. दरम्यान, ज्यावेळी मी माझे कौमार्य गमावले त्यावेळी मी माझ्या पालकांना आज मी करून आलोय असं सांगितलं होतं. तसंच एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यामध्ये मला काहीच वाटत नाही. शिवाय, मी त्यांच्या उपलब्ध असण्याबाबत खुलेपणानं चर्चा करतो’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -