घरक्रीडाइंग्लंडचा बेन स्टोक्स ठरला 'आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर'

इंग्लंडचा बेन स्टोक्स ठरला ‘आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर’

Subscribe

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकला आहे. अष्टपैलू खळाडू बेन स्टोक्स कर्णधार झाल्यापासून इंग्लंडचा कसोटी संघ सातत्याने आक्रमक खेळी करत आहे. बेन स्टोक्स याने 2022 मध्ये कसोटीत 36.25 च्या सरासरीने 870 धावा केल्या आहेत.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकला आहे. अष्टपैलू खळाडू बेन स्टोक्स कर्णधार झाल्यापासून इंग्लंडचा कसोटी संघ सातत्याने आक्रमक खेळी करत आहे. बेन स्टोक्स याने 2022 मध्ये कसोटीत 36.25 च्या सरासरीने 870 धावा केल्या आहेत. तर 31.19 च्या सरासरीने 26 विकेट्स घेतल्या आहेत. (Ben Stokes Wins Icc Mens Test Cricketer Of The Year 2022 Award)

गतवर्षी कर्णधार बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असली, तरी त्यांचा कर्णधार होण्याचा प्रवास फार आव्हानात्मक ठरला. इंग्लंडचा अॅशेसमध्ये व्हाईट वॉश झाला होता. त्यामुळे इंग्लंडच्या संघात अनेक बदल होणार होते. मात्र ब्रँडन मॅक्युलम इंग्लंड कसोटी संघाचा कोच झाला. तसेच, इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद जो रूटकडून बेन स्टोक्सकडे देण्यात आले.

- Advertisement -

त्यानंतर इंग्लंडच्या संघाने अत्यंत आक्रमक कसोटी खेळण्या सुरूवात केली. त्यामुळे इंग्लंडचा कसोटी संघ एका वेगळ्याच उंचीवर गेला. बेन स्टोक्स कर्णधार झाल्यापासून 10 कसोटी सामन्यापैकी 9 सामने जिंकले आहेत.

इंग्लंडने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेला मायदेशात हरवले. त्यानंतर भारतासोबत झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिका 2 – 2 अशी बरोबरीत सोडवली. त्यानंतर पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये 3-0 असा व्हाईट वॉश देत ऐतिहासिक विजय मिळवला.

- Advertisement -

दरम्यान, इंग्लंडचे प्लेयर्स आयसीसीच्या अनेक नियमांवर टीका करताना दिसतात. आयसीसीच्या सॉफ्ट सिग्लन नियमांवर बेन स्टोक्सने सडकून टीका केली होती. ICC Men’s Test Cricketer of the Year 2022 होण्याचा सन्मान स्टोक्सने मिळवलाच आहे. पण आयसीसीने निवडलेल्या टेस्टच्या संघात (ICC Men’s Test Team of the Year) त्याला स्थान दिले आहे.


हेही वाचा – महिला आयपीएलने मोडला 2008 चा रेकॉर्ड, आजचा दिवस ऐतिहासिक; जय शाहांची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -