दादर येथील आर.ए. रेसिडेन्सी टॉवरमध्ये भीषण आग

दादर (पूर्व), मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासमोरील आर.ए. रेसिडेन्सी टॉवर या तळमजला अधिक ४४ मजली इमारतीमध्ये ४२ व्या मजल्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.

andheri lokhandwala complex massive fire 10 injured

मुंबई : दादर (पूर्व), मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासमोरील आर.ए. रेसिडेन्सी टॉवर या तळमजला अधिक ४४ मजली इमारतीमध्ये ४२ व्या मजल्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र वित्तीय हानी झाली आहे. (Massive fire in R A Residency Tower in Dadar)

धक्कादायक बाब म्हणजे या टॉवरमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समजते. याप्रकरणी स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाकडून आगीचे कारण काय व आग कशामुळे लागली याबाबत अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग इलेक्ट्रिक पॅनलमध्ये लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आग १६ फायर इंजिन व ४ वॉटर टॅंकर, ९० मिटर उंचीची शिडी
यांच्या साहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. दरम्यान, अग्निशमन दलाने आगीची भीषणता पाहता रात्री उशिराने आग स्तर -४ ची असल्याचे जाहीर करण्यात आले. इमारत निवासी असल्याचे समजते. यावेळी, रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला.

दरम्यान, अंधेरी (पूर्व) साकिनाका, लिंक रोड, अजमेरी मस्जिदजवळ, अनिस कंपाऊंड, वायर गल्ली येथील एका गाळ्यात गुरुवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर काही अवधीतच अग्निशमन दलाने सदर भीषण आगीवर नियंत्रण मिळविले व आग विझविली.


हेही वाचा – भारतातील पहिली नोजल कोविड लस उपलब्ध; जाणून घ्या किंमत किती?