घरक्रीडा२०२२ राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याबाबत बात्रांशी मतभेद नाही!

२०२२ राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याबाबत बात्रांशी मतभेद नाही!

Subscribe

नेमबाजी या खेळाला वगळल्यामुळे २०२२ साली बर्मिंगहॅम येथे होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) विचार करत आहे. काही दिवसांपूर्वी आयओएचे अध्यक्ष नरेंदर बात्रा यांनी राष्ट्रकुल स्पर्धेला फारसे महत्त्व नाही आणि भारताला या स्पर्धेत खेळण्याची गरज नाही, असे विधान केले होते.

मात्र, बात्रा यांचे हे वैयक्तिक मत असून बहिष्काराबाबतचा अंतिम निर्णय कार्यकारी समिती आणि सर्वसाधारण मंडळ घेईल, असे त्यानंतर चेन्नई येथे झालेल्या एका कार्यक्रमात आयओएचे महाव्यवस्थापक राजीव मेहता म्हणाले होते. परंतु, आता त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्यावरुन बात्रा आणि माझ्यात मतभेद नाही, असे मेहता यांनी सांगितले.

- Advertisement -

माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी ते शब्द बोललो नव्हतो. २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार घालण्यावरुन माझ्यात आणि बात्रांमध्ये मतभेद नाहीत. जेव्हा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा आधी कार्यकारी समिती निर्णय घेते आणि त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय घेतला जातो, असे मी त्यावेळी म्हणालो होतो. मात्र, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि याचा मलाही धक्का बसला होता. मी त्यावेळी केवळ कार्यकारी समितीबाबत बोललो होतो, असे मेहता म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -