घरमहाराष्ट्रपती भाजपत, तर पत्नी राष्ट्रवादीत तरीही गुण्यागोविंदाने होतोय संसार

पती भाजपत, तर पत्नी राष्ट्रवादीत तरीही गुण्यागोविंदाने होतोय संसार

Subscribe

राजकारणात कोण, कोणाचा नसतो, असे म्हटले जाते. ते शब्दश: खरे झाले आहे पुण्यात. येथे पती एका पक्षात तर पत्नी दुसर्‍या. तरीही ते गुण्यागोविंदाने आपआपल्या पक्षांचा प्रचार करत आहेत. मात्र त्यांच्या या पॉलिटिकल ड्राम्यामुळे मतदार मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत.

पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीने भाजप प्रवेश करून भाजप उमेदवाराचा प्रचार सुरू केला. तर नगरसेविकेनेही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. मात्र त्यांनी हे राजकारण आपल्या घरात आणलेले नाही. त्यामुळे दिवसभर एकमेकांना जाहीरपणे शिव्या देणारे हे जोडपे राजकारण घराबाहेर ठेऊन गुण्यागोविंदाने जगत आहेत.

- Advertisement -

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र. 1 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फटका बसेल, असे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीने भाजप प्रवेश केल्यामुळे पत्नी राष्ट्रवादीच्या प्रचारात सहभागी होणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात होता.

मात्र रविवारी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फुटला. तेव्हा या नगरसेविका या प्रचारात सहभागी झाल्या आणि त्यांनी कामाला सुरुवातही केली आहे. यामुळे आता नवरा भाजपचा तर बायको राष्ट्रवादीचा प्रचार करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -