घरक्रीडाबुमराहची अव्वल दहामध्ये एंट्री

बुमराहची अव्वल दहामध्ये एंट्री

Subscribe

जागतिक कसोटी क्रमवारी

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीतील गोलंदाजांच्या यादीत पहिल्यांदा अव्वल १० मध्ये प्रवेश केला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजांमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याच्यात आणि दुसर्‍या स्थानी असणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथमध्ये केवळ ६ गुणांचा फरक आहे. अ‍ॅशेस मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात मॅचविनींग शतक करणार्‍या इंग्लंडच्या बेन स्टोक्सने फलंदाजांमध्ये १३ व्या, तर अष्टपैलूंमध्ये दुसर्‍या स्थानी झेप घेतली.

बुमराहने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात अवघ्या ७ धावांत ५ विकेट्स मिळवण्याची किमया केली. या सामन्यादरम्यान तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० विकेट्स मिळवणारा भारतीय गोलंदाज झाला. त्याने अवघ्या ११ व्या सामन्यातच ५० बळींचा टप्पा पार केला. त्यामुळे त्याने गोलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानी झेप घेतली. या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानी आहे. फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी असणार्‍या कोहलीच्या खात्यात ९१०, तर स्मिथच्या खात्यात ९०४ गुण आहेत. विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत ८१ आणि १०२ धावा करणार्‍या भारताच्या अजिंक्य रहाणेला १० स्थानांची बढती मिळाली असून तो ११ व्या स्थानी पोहोचला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -