घरमुंबईबेस्टने २ हजार कर्मचार्‍यांची ग्रच्युईटी रक्कम दिली

बेस्टने २ हजार कर्मचार्‍यांची ग्रच्युईटी रक्कम दिली

Subscribe

महापालिकेने ९१६ कोटी दिल्याने मिळाला दिलासा

कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या बेस्ट उपक्रमाला कर्जमुक्त करण्यासाठी मुबर्ई महानगरपालिका धावून आली आहे. महापालिकाने बेस्टला 1600 कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते. त्याअंतर्गत आत्तापर्यंत बेस्टला महापालिकेने एकूण ९१६ कोटी ३१ लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे 2 हजार कर्मचार्‍यांची थकलेली २०९ कोटी रुपयांची ग्रॅच्युईटीची रक्कम बेस्टने अदा केली. याचा बेस्टच्या कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला.

कर्जाचा बोजा आणि दररोज होणार्‍या तोट्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ‘बेस्ट’ला महापालिकेने काही अटी आणि शर्ती लादून 1600 कोटींची मदत करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बेस्टने महापालिकाकडून ठेवलेल्या अटी आणि शर्तीची अंमलबजावनी सुरू केली. महापालिका दर महिन्याला बेस्टला १०० कोटी रुपये देत आहे. आत्तापर्यंत बेस्टला पालिकेने एकूण ९१६ कोटी ३१ लाख रुपये दिलेले आहेत. त्यातून बेस्ट प्रशासनाने एप्रिल १७ ते एप्रिल १८ या कालावधीत निवृत्त झालेल्या २ हजार बेस्ट कर्मचार्‍यांची थकीत रक्कम ७ ते २६ ऑगस्ट दरम्यान दिली. २०९ कोटी रुपयांची ग्रॅच्युईटी रक्कम होती. सोबतच १८ एप्रिल ते आतापर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांंची ग्रॅच्युईटीची रक्कम देणे शिल्लक असून लवकरच ती देण्यात येणार आहे.

- Advertisement -

सातव्या वेतनावर अद्याप निर्णय नाही
बेस्ट प्रशासनासाठी कर्मचारी हा महत्त्वाचा आहे. सध्या बेस्टची आर्थिक स्थिती सुधारत असून सर्वकाही सुरळीत होत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनी संयम बाळगावा, असे आवाहन करीत सातव्या वेतन आयोगासंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे देखील बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र कुमार बागडे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -