घरक्रीडाक्रिस सिल्वरवूड इंग्लंडचे नवे प्रशिक्षक

क्रिस सिल्वरवूड इंग्लंडचे नवे प्रशिक्षक

Subscribe

माजी क्रिकेटपटू क्रिस सिल्वरवूड यांची इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक झाली आहे. ४४ वर्षीय सिल्वरवूड हे याआधी इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होते. आता त्यांना बढती देण्यात आली आहे.

विश्व विजेता इंग्लंडचा पुरुष क्रिकेट संघ मागील काही दिवसांपासून नव्या मुख्य प्रशिक्षकांच्या शोधात होता. इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणाऱ्या प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधील २०१९ क्रिकेट मोसम संपल्यानंतर आपले पद सोडले होते. अखेर सोमवारी इंग्लंडला नवे प्रशिक्षक मिळालेच. माजी क्रिकेटपटू क्रिस सिल्वरवूड यांची इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक झाली आहे. ४४ वर्षीय सिल्वरवूड हे याआधी इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होते. आता त्यांना बढती देण्यात आली आहे.


हेही वाचा – हार्दिक पांड्यावर शस्त्रक्रिया!

- Advertisement -

सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व

इंग्लंडच्या संघाने काही महिन्यांपूर्वी घरच्या मैदानावर झालेला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर झालेली अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरीत संपवण्यात त्यांना यश आले. ही मालिका संपल्यावर ट्रेवर बेलिस प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले. त्यांची जागा घेण्यासाठी भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि इंग्लंडचे माजी कर्णधार अॅलेक स्टुअर्ट हे प्रमुख दावेदार मानले जात होते. परंतु, स्टुअर्ट यांनी कौटुंबिक कारणांमुळे आपण प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने सिल्वरवूड यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. सिल्वरवूड यांनी सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. ते २०१७ सालच्या शेवटापासून इंग्लंडचे वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम करत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -