घरक्रीडाIND vs ENG 2nd ODI : बेअरस्टो, स्टोक्सचा झंझावात; इंग्लंडची भारतावर ६ विकेट...

IND vs ENG 2nd ODI : बेअरस्टो, स्टोक्सचा झंझावात; इंग्लंडची भारतावर ६ विकेट राखून मात

Subscribe

या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

जॉनी बेअरस्टोचे शतक, तसेच बेन स्टोक्सने केलेल्या ९९ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ६ विकेट व ३९ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. पहिल्या सामन्यात सलामीवीर बेअरस्टोचे शतक केवळ सहा धावांनी हुकले होते. या सामन्यात मात्र त्याने अप्रतिम फलंदाजी करताना ११२ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १२४ धावांची खेळी केली. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील ११ वे शतक ठरले. त्याला स्टोक्सने ५२ चेंडूत ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ९९ धावा करत उत्तम साथ दिली.

११० धावांची सलामी

पुण्यात झालेल्या या सामन्यात भारताने ५० षटकांत ६ बाद ३३६ अशी धावसंख्या उभारली होती. याचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि बेअरस्टो यांनी ११० धावांची सलामी दिल्यावर रॉयला (५५) रोहित शर्माने धावचीत केले. बेअरस्टोने मात्र दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी सुरु ठेवत ९५ चेंडूत शतक झळकावले. त्याला स्टोक्सने उत्तम साथ दिली. मात्र, त्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. तर बेअरस्टो आणि जॉस बटलर (०) यांना प्रसिध कृष्णाने झटपट माघारी पाठवले. परंतु, डाविड मलान (नाबाद १६) आणि लियम लिविंगस्टन (नाबाद २७) यांनी उर्वरित धावा करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.

- Advertisement -

लोकेश राहुलचे शतक 

त्याआधी या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर शिखर धवन (४) आणि रोहित शर्मा (२५) झटपट बाद झाले. मात्र, कर्णधार विराट कोहली (६६) आणि लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. राहुलने १०८ चेंडूत आपले एकदिवसीय क्रिकेटमधील पाचवे शतक केले. त्याला रिषभ पंतची साथ लाभली. पंतने अवघ्या ४० चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. राहुल १०८ धावा करून बाद झाला. यानंतर अखेरच्या षटकांत हार्दिक पांड्याने (३५) केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने ५० षटकांत ६ बाद ३३६ अशी मजल मारली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -