घरक्रीडालिव्हरपूलला पराभवाचा धक्का

लिव्हरपूलला पराभवाचा धक्का

Subscribe

४४ अपराजित सामन्यांची मालिका खंडित, इंग्लिश प्रीमियर लीग

इस्माईल सारच्या दोन गोलमुळे वॉटफर्डने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात बलाढ्य लिव्हरपूलला ३-० असा पराभवाचा धक्का दिला. लिव्हरपूलचा हा ४४ सामन्यांतील आणि या मोसमातील पहिला पराभव ठरला. तसेच लिव्हरपूलला प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक सलग सामने (१८) जिंकण्याचा मँचेस्टर सिटीचा विक्रम मोडण्यातही अपयश आले. मात्र, असे असतानाही त्यांनी प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यातील आपले अव्वल स्थानी कायम राखले आहे. यंदा २८ पैकी २६ सामने जिंकणार्‍या लिव्हरपूलचे ७९ गुण असून दुसर्‍या स्थानावरील मँचेस्टर सिटीचे ५७ गुण आहेत.

लिव्हरपूलविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच वॉटफर्डने आक्रमक खेळ केला. त्यांना पूर्वार्धात गोल करण्याच्या काही संधीही मिळाल्या. मात्र, त्यांना याचा फायदा घेण्यात अपयश आल्याने मध्यंतराला सामन्यात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र ५४ व्या मिनिटाला डोकुरेच्या पासवर सारने गोल करत वॉटफर्डला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर सहा मिनिटांनंतर सारने आपला आणि संघाचा दुसरा गोल केला. यानंतर लिव्हरपूलने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

६५ व्या मिनिटाला त्यांच्या अ‍ॅडम ललानाने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. दुसरीकडे वॉटफर्डचा कर्णधार ट्रॉय डीनीला गोल करण्याची संधी मिळाली आणि त्याने याचे गोलमध्ये रूपांतर करत आपल्या संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखत हा सामना जिंकला.

चेल्सी-बोर्नमथ सामन्यात बरोबरी

चेल्सी आणि बोर्नमथ यांच्यातील प्रीमियर लीगचा सामना २-२ असा बरोबरीत संपला. या सामन्यात ३३ व्या मिनिटाला मार्कोस अलोन्सोने गोल करत चेल्सीला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धाच्या सुरुवातीला बोर्नमथच्या जेफर्सन लर्मा आणि जॉश किंगने केलेल्या गोलमुळे चेल्सीचा संघ १-२ असा पिछाडीवर पडला. मात्र, ८५ व्या मिनिटाला अलोन्सोने केलेल्या गोलमुळे सामना २-२ असा बरोबरीत संपला. क्रिस्टल पॅलेस आणि वेस्ट हॅम यांना मात्र आपापले सामने जिंकण्यात यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -