घरक्रीडामँचेस्टर सिटीचा ’फाईव्ह स्टार’ विजय

मँचेस्टर सिटीचा ’फाईव्ह स्टार’ विजय

Subscribe

इंग्लिश प्रीमियर लीग

फिल फोडेन आणि रियाद महारेझ यांनी केलेल्या दोन-दोन गोलच्या जोरावर गतविजेत्या मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात बर्नली संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. करोनानंतर ही स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यापासून सिटीचा हा सलग दुसरा, तर यंदाच्या मोसमात ३० सामन्यांतील २० वा विजय होता. त्यामुळे ६३ गुणांसह ते गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानी असून त्यांच्यात आणि अव्वल स्थानावरील लिव्हरपूलमध्ये तब्बल २० गुणांचा फरक आहे.

बर्नलीविरुद्धच्या सामन्यात सिटीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना २२ व्या मिनिटाला झाला, जेव्हा फोडेनने गोल करत सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर महारेझने ४३ आणि ४५+३ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे मध्यंतराला सिटीकडे ३-० अशी आघाडी होती. उत्तरार्धातही त्यांनी आक्रमण सुरूच ठेवले. ५१ व्या मिनिटाला डाविड सिल्वा, तर ६३ व्हा मिनिटाला फोडेनने सिटीसाठी आणखी दोन गोल केले.

- Advertisement -

यानंतर बर्नलीला पुनरागमन करता आले नाही आणि सिटीने सामना ५-० असा जिंकला. या सामन्यात सिटीचा स्टार खेळाडू सर्जिओ अग्वेरोच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तो उर्वरित मोसमाला मुकण्याची शक्यता आहे, असे सिटीचे प्रशिक्षक पेप ग्वार्डीओला यांनी सामन्यानंतर सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -