घरक्रीडापुन्हा धोनीसोबत खेळण्यास उत्सुक - दीपक चहर

पुन्हा धोनीसोबत खेळण्यास उत्सुक – दीपक चहर

Subscribe

धोनी आयपीएल स्पर्धेत सीएसकेचे नेतृत्व करणार आहे.

यंदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईत होणार आहे. या स्पर्धेची क्रिकेट चाहते आतुरतेने वाटत पाहत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाहण्याची चाहत्यांना संधी मिळणार आहे. भारताचा माजी कर्णधार धोनी एक वर्षाहूनही जास्त काळ क्रिकेट खेळलेला नाही. परंतु, आयपीएल स्पर्धेत तो चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचे नेतृत्व करणार आहे. धोनीच्या नेतृत्वात खेळण्यास सीएसकेचा गोलंदाज दीपक चहर खूप उत्सुक आहे.

सीएसके संघ एखाद्या कुटुंबाप्रमाणे

मागील चार मोसम मी सीएसके संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे मला धोनीच्या नेतृत्वात बरेच क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. सीएसके संघ एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे आणि धोनी आमचा प्रमुख आहे. तो त्याची जबाबदारी चोख बजावतो. तो एका वर्षाहूनही जास्त काळ भारतासाठी खेळलेला नाही, हे मला ठाऊक आहे. त्याला पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पाहताना मजा येईल. मी त्याच्यासोबत आणि त्याच्या नेतृत्वात पुन्हा खेळण्यास खूप उत्सुक आहे, असे चहर म्हणाला.

- Advertisement -

आम्ही यंदा आयपीएल जिंकू

मी आयपीएल स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे. धोनीच्या नेतृत्वात आम्ही (सीएसके) यंदा आयपीएल जिंकू याची मला खात्री आहे. डिसेंबरमध्ये दुखापत झाल्याने मला बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागले. आता मी पुन्हा क्रिकेट खेळण्यास सज्ज आहे. मी पूर्णपणे फिट आहे. आयपीएल ही खूपच मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतून मी पुन्हा मैदानात उतरणार असल्याचा आनंद आहे, असेही चहरने एका मुलाखतीत सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -