घरक्रीडाफेडरर उर्वरित मोसमाला मुकणार!

फेडरर उर्वरित मोसमाला मुकणार!

Subscribe

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर गुडघ्यावर दुसर्‍यांदा झालेल्या शस्त्रक्रियेमुळे उर्वरित २०२० मोसमाला मुकणार आहे. २० वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या फेडररने याबाबतची माहिती बुधवारी ट्विटरवरून दिली. फेडररला यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत गुडघ्याच्या दुखापतीने सतावले होते. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचने त्याच्यावर मात केली होती. ही स्पर्धा संपल्यावर फेब्रुवारीमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यातून तो अजून पूर्णपणे फिट झालेला नसल्याने त्याला यंदाच्या उर्वरित मोसमात खेळता येणार नाही.

शस्त्रक्रियेनंतर पुन्हा फिट होण्याचा प्रयत्न करत असताना काही आठवड्यांपूर्वी मला अडचणीचा सामना करावा लागला. माझ्या उजव्या गुडघ्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे २०१७ मोसम सुरु होण्याआधी मी ज्याप्रमाणे वेळ घेतला होता, तसाच वेळ मी आता १०० टक्के फिट होऊन सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी घेणार आहे. मला चाहते आणि दौर्‍यांची खूप आठवण येत राहील. परंतु, २०२१ मोसमात आपण पुन्हा भेटू, असे फेडररने आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले.

- Advertisement -

करोनामुळे सध्या टेनिसचे सामने होत नाहीयेत. त्यामुळे फेडरर यंदाच्या मोसमात फारशा स्पर्धांना मुकणार नाही. २०१६ मध्येही फेडररच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यामुळे तो त्या मोसमाच्या उत्तरार्धात खेळू शकला नव्हता. २०१७ मध्ये पुनरागमन करताना त्याने ऑस्ट्रेलियन ओपन ही मोसमाची पहिलीच ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर विम्बल्डनचेही जेतेपद पटकावले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -