घरक्रीडाभारतीय क्रिकेट संघ ऑगस्टमध्ये श्रीलंका दौर्‍यावर जाण्यास तयार

भारतीय क्रिकेट संघ ऑगस्टमध्ये श्रीलंका दौर्‍यावर जाण्यास तयार

Subscribe

श्रीलंकेतील वृत्तपत्राची माहिती

टीम इंडियाच्या चाहत्यांना आता आपल्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा मैदानात पाहण्यासाठी केवळ दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. करोनामुळे मार्चपासून सर्व प्रकारचे क्रिकेट बंद होते. भारतातही लॉकडाऊन असल्याने खेळाडूंना घरातच बसून राहावे लागत होते. परंतु, श्रीलंकेतील एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, भारतीय संघ दोन महिन्यात पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसू शकेल. बीसीसीआयने ऑगस्टमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौर्‍यावर येण्यासाठी श्रीलंका क्रिकेटला हिरवा कंदील दाखवल्याची माहिती या वृत्तपत्राने दिली आहे. मात्र, यासाठी भारत सरकारने परवानगी देणे गरजेचे आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय व तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिका जूनमध्ये खेळल्या जाणार होत्या. परंतु, करोनामुळे भारताला हा दौरा पुढे ढकलणे भाग पडले. आता ऑगस्टमध्ये हा दौरा होण्याची शक्यता असून या द्विपक्षीय मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाकडून परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.

- Advertisement -

श्रीलंकेतही लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणण्यात आली आहे. तसेच ऑगस्टमध्ये श्रीलंकेत पुन्हा पर्यटनालाही सुरुवात होणार असल्याने या मालिकेसाठी परवानगी मिळेल, अशी श्रीलंका क्रिकेटला खात्री आहे. तसेच श्रीलंका आशिया चषक टी-२० स्पर्धेचेही आयोजन करण्यास तयार आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -