घरक्रीडाफेडररवर मात करत नदाल अंतिम फेरीत

फेडररवर मात करत नदाल अंतिम फेरीत

Subscribe

फ्रेंच ओपन टेनिस

स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हे टेनिसमधील दोन महान खेळाडू एकमेकांसमोर आले की त्यांच्यातील सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. हे दोघे शुक्रवारी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते आणि क्ले (मातीच्या) कोर्टवर नदालने आपला दबदबा कायम ठेवत फेडररचा ६-३, ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयामुळे ही स्पर्धा एकूण ११ वेळा आणि मागील २ वेळा जिंकणार्‍या नदालने बाराव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

या सामन्याची दमदार करत पहिल्या सेटमध्ये नदालने ३-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर फेडररने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदालने आपला चांगला खेळ सुरु ठेवत पहिला सेट ६-३ असा जिंकला. दुसर्‍या सेटची फेडररने चांगली सुरुवात करत दुसर्‍याच गेममध्ये नदालची सर्विस मोडत २-० अशी आघाडी मिळवली. मात्र, नदालने फेडररची सर्विस मोडत आणि आपली सर्विस राखत २-२ अशी बरोबरी केली. यानंतर ४-४ अशी बरोबरी असताना नदालने पुन्हा एकदा फेडररची सर्विस मोडत आणि आपली सर्विस राखत हा सेट ६-४ असा जिंकला. त्यामुळे आपले आव्हान टिकवण्यासाठी फेडररला हा सेट जिंकणे अनिवार्य झाले. मात्र, या सेटच्या तिसर्‍याच गेममध्ये नदालने फेडररची सर्विस मोडली आणि २-१ अशी आघाडी मिळवली. यानंतर आपली सर्विस राखत आणि पुन्हा फेडररची सर्विस मोडत ४-१ अशी आघाडी. यानंतर नदालने फेडररला आपली सर्विस मोडू दिली नाही आणि हा सेट ६-२ असा आपल्या खिशात घालत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -