घरIPL 2020IPL 2020 : तर विराट कोहली, रोहितही अडचणीत सापडू शकतात!

IPL 2020 : तर विराट कोहली, रोहितही अडचणीत सापडू शकतात!

Subscribe

नॉर्खियाने ९ सामन्यांत १२ बळी मिळवले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांना आतापर्यंत ९ पैकी ७ सामने जिंकण्यात यश आले असून प्ले-ऑफमधील त्यांचा प्रवेश जवळपास निश्चितच आहे. दिल्लीच्या यशात दक्षिण आफ्रिकन तेज जोडगोळी एन्रिच नॉर्खिया आणि कागिसो रबाडा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यंदा सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडा अव्वल स्थानावर असून त्याने ९ सामन्यांत १९ विकेट घेतल्या आहेत. त्याला नॉर्खियाची उत्तम साथ लाभली असून त्याने ९ सामन्यांत १२ बळी मिळवले आहेत. खासकरून नॉर्खियाने त्याच्या तेजतर्रार माऱ्याने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यासोबत तो योग्य टप्प्यावरही गोलंदाजी करत आहे. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केल्यास विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे फलंदाजची अडचणीत सापडू शकतात असे मत नॉर्खियाने व्यक्त केले.

मी फारसा विचार करत नाही

कोणत्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करत आहे, याचा मी फारसा विचार करत नाही. मी केवळ आम्ही ठरवल्यानुसार, आमच्या योजनेनुसार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, फलंदाज जितका चांगला, तितका गोलंदाजालाही त्याचा खेळ उंचावावा लागतो. तुम्ही गोलंदाज म्हणून योग्य टप्प्यावर चेंडू टाकल्यास चांगल्या-चांगल्या फलंदाजांना धावा करणे अवघड होते. योग्य टप्प्यावर, फलंदाजाची कमकुवत बाजू लक्षात घेऊन गोलंदाजी केल्यास विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारखे उत्कृष्ट फलंदाजही अडचणीत सापडू शकतात, असे एन्रिच नॉर्खिया म्हणाला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -