घरक्रीडाकेस हवेत उडतायत; अंपायर पुरुष आहे की महिला? ओळखा पाहू

केस हवेत उडतायत; अंपायर पुरुष आहे की महिला? ओळखा पाहू

Subscribe

रविवारीचे आयपीएलचा दोन्ही सामना कमालीचा चुरशीचा झाला. किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या. तर कोलकता नाईट रायडर्स (KKR) आणि हैदराबादमध्ये (SRH) एक सुपर ओव्हर झाली. रविवार सुपर ओव्हर झाल्यामुळे या दोन्ही सामन्याची चांगली चर्चा झाली. पण आणखी एका कारणामुळे रविवारच्या सामना चर्चेत आला होता.

वास्तविक, रविवारी अबुधाबी येथील सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात एक लांब केसाचा अंपायर खूप चर्चेत आला. अंपायर नक्की पुरुष आणि स्त्री हे समजेनासे झाले. त्यामुळे अंपायर केसामुळे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

- Advertisement -

चर्चेत आलेला अंपायर स्त्री नसून पुरुष आहे. या अंपायरचं नाव पश्चिम पाठक असं आहे. जेव्हा रविवारी पश्चिम पाठक सहकारी एस रवी यांच्यासह मैदानावर उतरले तेव्हा पश्चिम पाठक यांना पाहून सगळे हैराण झाले. लांब केस असलेले हे अंपायर नक्की आहेत तरी कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला. अनोख्या केशभूषा करून पश्चिम पाठक मैदानवर उतरले होते. यापूर्वी पश्चिम पाठक अशा लांबसडक केसात कधी दिसले नव्हते.

४३ वर्षीय पश्चिम पाठक २०१४ पासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये अंपायरिंग करत आहेत. अंपायरिंग करण्याचा हा त्यांचा आठवा सामना आहे. २०१२ मध्ये दोन महिला एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही अंपायरिंग केलं होते. २०१५ मध्ये पश्चिम पाठक हे हेल्मेट घालून अंपायरिंग करणाऱे पहिले भारतीय अंपायर होते. पण रविवारी केलेली त्यांची अनोखी हेअरस्टाईल चांगलीच चर्चेत आली.

- Advertisement -

हेही वाचा – KXIP vs MI : २ Super Over च्या रोमांचक लढतीत पंजाब ठरली अव्वल, मुंबई पराभूत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -