घरक्रीडाIND vs ENG Women : भारतीय संघाचा पराभव; चर्चा मात्र हर्लीन देओलच्या...

IND vs ENG Women : भारतीय संघाचा पराभव; चर्चा मात्र हर्लीन देओलच्या कॅचची

Subscribe

आजी-माजी क्रिकेटपटूंसह भारतातील नेतेमंडळींनी हर्लीनचे कौतुक केले.

भारतीय महिला संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. भारताचा पुरुष संघ असो किंवा महिला, हा संघ पराभूत झाल्यावर बरीच चर्चा रंगते. परंतु, भारतीय महिला संघाच्या या पराभवापेक्षा भारताची खेळाडू हर्लीन देओलने पकडलेल्या उत्कृष्ट कॅचबाबत अधिक चर्चा होताना दिसत आहे. भारताला हा सामना जिंकण्यात जरी अपयश आले असले, तरी हर्लीनने चाहत्यांची मने मात्र जिंकली. उत्कृष्ट कॅच पकडल्याबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस लक्ष्मण आणि विंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीसह अनेकांनी हर्लीनचे कौतुक केले.

या सामन्यात इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यांच्या डावातील १९ वे षटक भारताकडून मध्यम गती गोलंदाज शिखा पांडेने टाकले. या षटकातील पाचव्या चेंडूवर इंग्लंडच्या एमी जोन्सने मोठा फटका मारला. चेंडू सीमारेषेबाहेर जाणार असे वाटत असतानाच लॉग ऑफवर उभ्या असलेल्या हर्लीनने उंच उडी मारत चेंडू अडवला, पण आपण सीमारेषेबाहेर जात आहोत हे कळल्यावर तिने चेंडू मैदानाच्या आतल्या बाजूला फेकला. मग अप्रतिम सूर मारत तिने चेंडू हवेतच पकडत कॅच पूर्ण केला. तिच्या या उत्कृष्ट कॅचची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. सचिनने तर हर्लीनचा हा कॅच म्हणजे वर्षातील सर्वोत्तम कॅच होता असे म्हणत स्तुती केली.

- Advertisement -

- Advertisement -

हर्लीनच्या या कॅचचे केवळ आजी-माजी क्रिकेटपटूंनीच नाही, भारतातील नेतेमंडळींनीही कौतुक केले.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -