अनुष्का-विराटच्या नव्या व्हिडिओमध्ये दिसला वामिकाचा स्लीपिंग मॅट; सोशल मीडियावर झाला व्हायरल

Anushka Sharma-Virat Kohli's latest video goes viral
अनुष्का-विराटच्या नव्या व्हिडिओमध्ये दिसला वामिकाचा स्लीपिंग मॅट; सोशल मीडियावर झाला व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा क्रिकेटर विराट कोहली या दोघांची जोडी जगभरात लोकप्रिय आहे. सध्या अनुष्का-विराटची मुलगी जन्मल्यापासून सेलिब्रिटीप्रमाणे नेहमी चर्चेत असते. अनुष्का-विराटचे चाहते वामिकाला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. वामिकाची एखादी छोटीशी झलक समोर येते, त्यावेळेस चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो.

नुकताच अनुष्का-विराटचा एक व्हिडिओ व्हायरस झाला आहे. त्यामध्ये त्यांची मुलगी वामिकाचा झोपण्याचा मॅट त्याच्यामागे दिसत आहे. वामिकाचा मॅटचा फोटो चाहत्यांसाठी खूप मोठी गोष्ट झाली आहे. जसा हा व्हिडिओ पब्लिश झाला, तसा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत. तर त्यांच्या मागे वामिकाचा कार्टून प्रिंटेड मॅट दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul.N.Kanal (@rahulnarainkanal)

काही दिवसांपूर्वी अनुष्काला वामिकासोबत इंग्लंडमध्ये फिरताना पाहिलं गेलं होत. यावेळेस अनुष्का आपल्या मुलीसोबत विराट कोहलीची वर्ल्ड चँपियनशिप फायनलसाठी इंग्लंडमध्ये गेली होती. सामना संपल्यानंतर अनुष्काने कुटुंबासोबत एन्जॉय केले. यादरम्यान अनुष्काने विराटसोबत एक फोटो शेअर केला होता.

यावर्षी ११ जानेवारीला अनुष्काने वामिकाला जन्म दिला. त्यानंतर १ फेब्रुवारीला तिचे नामकरण करण्यात आले. तेव्हापासून वामिकाला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. सोशल मीडियावर खूप दिवस वामिका जन्मला आल्यानंतर ट्रेडिंगमध्ये होती.


हेही वाचा – कंगनाची कार्बन कॉपी पाहिलीत का? सोशल मीडियावर होतेय व्हायरल