घरक्रीडाटीम इंडियाचे ‘ते’ दोन कसोटी सामने फिक्स नव्हते; आयसीसीचे स्पष्टीकरण

टीम इंडियाचे ‘ते’ दोन कसोटी सामने फिक्स नव्हते; आयसीसीचे स्पष्टीकरण

Subscribe

भारताचे दोन कसोटी सामने फिक्स केल्याचे म्हटले गेले होते.

अल-जझीरा या वृत्तवाहिनीने २०१८ साली ‘क्रिकेट्स मॅच फिक्सर्स’ नामक माहितीपट (डॉक्यूमेंट्री) प्रदर्शित केला होता. यामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात २०१६ मध्ये झालेली चेन्नई कसोटी, तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २०१७ मध्ये झालेली रांची कसोटी फिक्स केल्याचे म्हटले गेले होते. मात्र, त्यांचा हा दावा खोटा असून भारताचे कोणतेही सामने फिक्स करण्यात आले नव्हते, असे स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी दिले. अल-जझीराने या माहितीपटामध्ये पाच जणांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. मात्र, हे पाचही जण निर्दोष असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

दाव्यामध्ये तथ्य नाही 

अनिल मुन्नावर नामक बुकीने काही खेळाडूंशी आपला संपर्क असल्याचे, तसेच काही सामने फिक्स केल्याचे अल-जझीराच्या माहितीपटामध्ये म्हटले होते. फिक्स करण्यात आलेल्या सामन्यांमध्ये भारताच्या दोन कसोटीचा समावेश होता. हा माहितीपट प्रदर्शित झाल्यावर आयसीसीने या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. मात्र, अल-जझीराने केलेल्या दाव्यामध्ये तथ्य नसल्याचे आयसीसीने आता स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

सामने फिक्स असू शकत नाहीत

‘या माहितीपटामध्ये भारताचे दोन कसोटी सामने फिक्स केल्याचे म्हटले गेले होते. या दाव्यामध्ये तथ्य आहे का, हे शोधण्यासाठी आयसीसीने चार वेगवेगळ्या बेटिंग आणि क्रिकेटिंग तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली. या चारही तज्ज्ञ व्यक्तींच्या मते या माहितीपटात दाखवण्यात टप्प्यांचा अंदाज आधीच येऊ शकतो. त्यामुळे हे सामने फिक्स असू शकत नाहीत,’ असे आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -