घरICC WC 2023IND vs AUS : दोन सामने गमावल्यानंतर योग्य नियोजन, भारतीय फलंदाजांचा अभ्यास...

IND vs AUS : दोन सामने गमावल्यानंतर योग्य नियोजन, भारतीय फलंदाजांचा अभ्यास अन् ऑस्ट्रेलियाने जिंकले जेतेपद

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. त्यामुळे भारतीय संघाचे तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. विशेष म्हणजे आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत पोहचेल असे क्वचितच कोणाला वाटले नसेल. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपली भूमिका बदली आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवले विश्वचषकात अपारिजीत राहिलेल्या भारतीय संघाचा पराभव केला. या संपूर्ण प्रवासात ऑस्ट्रेलियाने जगाला दाखवून दिले की, विश्वविजेते कसे बनता येते. (IND vs AUS After losing two matches proper planning study of Indian batsmen and Australia won the title)

विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने करो या मरो असे सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे अफगाणिस्तानविरुद्ध आठव्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी करून थरारक विजय मिळवला होता. त्यानंतर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कठीण परिस्थितीत विजय मिळवला. या अशा रोमांचक विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाला कठीण परिस्थित धैर्य राखण्याचे बळ मिळाले आणि याचाच फायदा त्यांना अंतिम सामन्यात झाला. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून मिळालेल्या दारुण पराभवाचा बदला घेत विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरले.

- Advertisement -

हेही वाचा – Travis Head : रोहित शर्माबाबत ट्रॅव्हिस हेडचे विधान चर्चेत; सामना जिंकल्यानंतर काय म्हणाला?

गोलंदाजांकडून भारतीय फलंदाजांचा चांगला अभ्यास 

विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा चांगला अभ्यास केला होता. गोलंदाजांनी भारताच्या प्रत्येक फलंदाजाविरुद्ध वेगळी रणनीती आखली होती. गोलंदाजांनी बहुतांश चेंडू ‘बॅक ऑफ लेंथ’ टाकले, जे खेळण्यात भारतीय फलंदाजांना सपशेल अपयशी ठरले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खूप मोठे आहे. अशा मैदानावर बाउंड्री मोठी असल्याने भारतीय फलंदाजा मोठे फटके मारण्याची जोखीम घेणार नाहीत आणि ते स्ट्राइटही रोटेट करू शकत नाहीत. यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतीय फलंदाजांचा चांगला अभ्यास केल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

खेळपट्टी समजून घेण्यात ऑस्ट्रेलिया सरस

ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर रोहित शर्माने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याच्या त्याच्या निर्णयाबद्दल स्पष्टता केली होती. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांना फारसा फायदा झाला नसला तरी त्यांनी टाकलेले चेंडू भारतीय फलंदाजांच्या बॅटवर सहज येत नव्हते. मात्र दुसऱ्या डावात संध्याकाळी दव पडल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बॅटींग करणे सोपे गेले. भारतीय फिरकीपटून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फारसा त्रास देऊ शकले नाहीत. त्यामुळे या सामन्यात खेळपट्टी समजून घेण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय योग्य ठरल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – Mitchell Marsh : सामना जिंकल्यानंतर खेळाडूचे ट्रॉफीसोबत लाजिरवाणे कृत्य; सोशल मीडियावर तुफान ट्रोल

संघाचा गेम प्लॅन मैदानावर योग्य प्रकारे राबवला

कर्णधार पॅट कमिन्सने संघाचा संपूर्ण गेम प्लॅन मैदानावर चांगल्या प्रकारे राबवला. त्याने फलंदाजांनुसार गोलंदाजांमध्ये वेळोवेळी चांगले बदल केले. परिस्थितीनुसार खेळण्याऐवजी कमिन्सने भारतीय गोलंदाजांसमोर परिस्थिती निर्माण केली. त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी चेंडू लवकर जुना करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून चेंडू रिव्हर्स स्विंग होईल आणि भारतीय फलंदाजांना वेगवान धावा करण्यापासून रोखता येईल. अंतिम सामन्यात पॅट कमिन्सने संघाच्या सर्व योजना चांगल्या प्रकारे राबविल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आणि  तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न धुळीत मिळवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -