घरICC WC 2023IND vs AUS WC Final : भारतीय संघ एकमेव बदलासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात...

IND vs AUS WC Final : भारतीय संघ एकमेव बदलासह ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार? ‘अशी’ असेल प्लेइंग इलेव्हन

Subscribe

अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विश्वचषकाचा विजेता रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला जगाला मिळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या अहमदाबादच्या (Ahmadabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. अशातच भारतीय संघ अंतिम सामन्यात एक बदल करणार असल्याचे संकेत सराव सत्रातून मिळत आहेत. (IND vs AUS WC Final Indian team will take the field against Australia with only one change rohit sharma R Ashwin)

हेही वाचा – WC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून वादाचा प्रयत्न; अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य चर्चेत

- Advertisement -

विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. अंतिम सामन्यापूर्वी अनेक समीकरणेही भारतीय संघाच्या बाजूने लागली आहेत. संघाचा सध्याचा फॉर्म आणि घरची परिस्थिती पाहता भारतीय संघ 2023 च्या विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय नोंदवला होता. त्यामुळे भारतीय संघ तीच प्लेइंग इलेव्हन ऑस्ट्रेलियाविरुद्ध असे सर्वांना वाटत असले तरी त्यात एक बदल होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भारतीय संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर जोरदार सराव करत आहे. यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणाचा भरपूर सराव करताना दिसला. त्यामुळे अंतिम सामन्यात खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय वरिष्ठ ऑफस्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही गोलंदाजीचा सराव केला आहे. खरे तर अश्विनचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम चांगलाच राहिला आहे. याशिवाय डेव्हिड वॉर्नरविरुद्धही तो खूप प्रभावी ठरला असून ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीचे फलंदाज डावखुरे आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माचा स्लिप क्षेत्ररक्षण आणि अश्विनच्या गोलंदाजीचा सराव पाहता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारत तीन फिरकी गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ICC WC 2023 Final: अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? जाणून घ्या

अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले तर मोहम्मद सिराजला अंतिम सामन्यात बाहेर बसावे लागू शकते. कारण गेल्या काही सामन्यात तो फार चांगली गोलंदाजी करू शकला नाही आहे. मात्र तो सोडल्यास संघातील प्रत्येक खेळाडूंने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात आर अश्विनला संधी मिळाली तर मोहम्मद सिराजशिवाय इतर कोणतेही बदल अपेक्षित नाहीत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज/रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -